पुणो : दोनच महिन्यांपूर्वी परदेशातून शिक्षणासाठी भारतात आलेल्या तरुणीवर पत्ता दाखविण्याच्या बहाण्याने निजर्न ठिकाणी नेऊन बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार काल रात्री घडला. मित्रला भेटण्यासाठी जात असताना, ती पत्ता चुकली असताना ससून रुग्णालया समोरून तिला खडकी येथील रेल्वेपुलावर नेण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी मोबाईलच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला 24 तासांच्या आत अटक केली.
नोव्हेल सॅव्हिलो जोसेफ ािस्तोफर जोसेफ (वय 32, रा. खडकी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 18 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेहाना शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची मुंबईची असून, तिचे आईवडील सौदी अरेबियाला असतात. ही तरुणी दोन महिन्यांपूर्वी ती महाविद्यालयीन शिक्षणाकरिता भारतात आली आहे.
सिम्बायोसिस महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या बालमित्रला भेटायला निघाली होती. रस्ता चुकल्यामुळे रात्री साडेअकराच्या सुमारास ससूनसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाजवळ ती थांबली होती. येथून जात असलेल्या नोव्हेलने मोटारसायकलच्या डिक्कीतील चिठ्ठी रस्त्यावर टाकून या तरुणीला तुमचा कागद पडला, अशी थाप मारली. तिने सिम्बायोसिस महाविद्यालयाचा पत्ता विचारला. पत्ता व्यवस्थित सांगता येत नव्हता म्हणून नोव्हेलचा मोबाईल घेऊन मित्रच्या मोबाईलवर संपर्क साधला. मित्रने आरोपीला पत्ता सांगितला. आरोपीने मागोमाग येण्यास सांगितल्यावर पीडित तरुणी तिच्या दुचाकीवरून त्याच्या मागे जाऊ लागली. खडकी येथील रेल्वे पुला खालून रेंजहिल्सकडे जाणा:या रस्त्यावर त्याने नेले. निजर्न ठिकाणी नेऊन तरुणीला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला.
(प्रतिनिधी)
- पीडित तरुणीवर अत्याचार केल्यानंतर, आरोपीने तिला तेथेच सोडून दिले. त्यानंतर या तरुणीने सिम्बायोसिस महाविद्यालय शोधून काढत मित्रची भेट घेतली. सर्व प्रकार सांगितल्यावर, त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेहाना शेख यांची भेट घेतली. शेख यांनी संपूर्ण हकिगत ऐकल्यावर तातडीने गुन्हा दाखल केला. आरोपीच्या मोबाईलवरून तरुणीने फोन केलेला होता. या मोबाईल क्रमांकावरून पोलिसांनी आरोपीची माहिती काढून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयाने 8 तारखेर्पयत पोलीस कोठडी सुनावली.