शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्याला सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:37 IST

अल्पवयीन मुलीला फू स लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणारा जितेंद्र यमाजी गायकवाड याला सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी बुधवारी (दि. ३ जुलै) पाच वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावला.

औरंगाबाद : अल्पवयीन मुलीला फू स लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणारा जितेंद्र यमाजी गायकवाड याला सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी बुधवारी (दि. ३ जुलै) पाच वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावला.या संदर्भात पीडित मुलीच्या पित्याने फिर्याद दिली होती की, १६ सप्टेंबर २०११ रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास ते लघुशंकेसाठी उठले होते. त्यांचा दरवाजा बाहेरून लावलेला होता. त्यामुळे शंका आल्याने त्यांनी त्यांची मुलगी झोपली होती तेथे जाऊन पाहिले असता, ती तिथे दिसली नाही. घरात व घराबाहेर तिचा शोध घेऊनही ती सापडली नाही. मुलीशी वारंवार जवळीक साधणारा आणि शेजारी राहणारा जितेंद्र यमाजी गायकवाड (२८) हादेखील त्याच्या घरात नसल्याचे आढळल्याने त्यानेच मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा फिर्यादीचा संशय बळावला. त्यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ३६३ आणि ३६६ अन्वये चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.१८ सप्टेंबर २०११ रोजी रात्री मुलगी व आरोपी औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आढळल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. आरोपीने दोन ते तीन वेळा अत्याचार केल्याचा जबाब मुलीने दिला होता. पोलिसांनी तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणीवेळी, सहायक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीनेच मुलीला घरातून पळवून नेल्याचे सिद्ध झाल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. पहाडिया यांनी केला. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३६३ अन्वये वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालय