शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पती, सासू आणि सासऱ्याला सश्रम कारावास, दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:35 IST

घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहिता उज्ज्वला हिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तिचा पती अनिल अण्णा जाधव, सासू शोभाबाई अण्णा जाधव व सासरा अण्णा ओंकार जाधव यांना मंगळवारी (दि. ११) सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांनी प्रत्येकी पाच वर्षे सश्रम कारावास आणि ११ हजार रुपये दंड ठोठावला.

औरंगाबाद : घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहिता उज्ज्वला हिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तिचा पती अनिल अण्णा जाधव, सासू शोभाबाई अण्णा जाधव व सासरा अण्णा ओंकार जाधव यांना मंगळवारी (दि. ११) सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांनी प्रत्येकी पाच वर्षे सश्रम कारावास आणि ११ हजार रुपये दंड ठोठावला.यासंदर्भात उज्ज्वलाचे वडील गजानन सूर्यभान जामोदे (४४, रा. अंभोरा, ता. नांदुरा, जि. बुलडाणा) यांनी फिर्याद दिली होती की, उज्ज्वला हिचे लग्न अनिल जाधव (२७, रा. आमखेडा, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) याच्याशी ७ मार्च २०१५ रोजी झाले. लग्नावेळी फिर्यादीने सासरच्या मंडळीला दीड लाख रुपये हुंडा दिला. लग्नानंतर काही दिवसांनी घर बांधायचे म्हणून दोन लाख रुपये माहेरून घेऊन येण्यासाठी सासरची मंडळी तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याचे तिने वडिलांना सांगितले होते. छळाला कंटाळून उज्ज्वलाने ९ आॅगस्ट २०१५ रोजी विष पिऊन आत्महत्या केली होती.यासंदर्भात सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याच्या सुनावणीवेळी, सहायक सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात फिर्यादीसह त्यांचा भाऊ प्रशांत गजाजन जामोदे, चुलत भाऊ बळीराम निवृत्ती जामोदे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने पती अनिल, सासू शोभाबाई व सासरा अण्णा जाधव यांना भादंवि कलम ३०६ अन्वये प्रत्येकी पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड आणि भादंवि कलम ४९८ (अ) अन्वये तिघांना प्रत्येकी एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड ठोठावला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालय