हिंगोली : शहरातील झालेल्या रांगोळी स्पर्धेत शैला जाधव तर होममिनिस्टरमध्ये ऋतू सोनी यांनी बाजी मारली. महिलांच्या प्रतिसादाने रंगतदार स्पर्धा झाली. हिंगोलीत दुपारी झालेल्या या स्पर्धेचे उदघाटक निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोपाल अग्रवाल, पंकज अग्रवाल आदी उपस्थित होते. रांगोळीत शैला जाधव यांनी पहिल्या क्रमांक पटकाविला. तर प्रज्ञा कुलकर्णी आणि प्रिती सोनी यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थानी राहिल्या. होममिनिस्टरमध्ये ऋतू सोनी यांनी बाजी मारली. तर सुलभा बासटवार आणि अर्चना पिंगळकर यांना द्वितीय व तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. याच स्पर्धेतील करूणा चौधरी व राजश्री सोळंके यांना प्रोत्साहनपर पारितोषिक मिळाले. यासाठी आरती मार्डीकर, वंदना सोवितकर, विद्या पवार, अर्चना जाधव यांनी परिश्रम घेतले.महोत्सवात फुटबॉल सामनेदसरा महोत्सावानिमित्त २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. फुटबॉल स्पर्धेचे उदघाटक समादेशक जे. एल. फुफाटे, निवासी जिल्हाधिकारी गगराणी, उपजिल्हाधिकारी फुलारी, पंकज अग्रवाल उपस्थित होते. यासाठी गोपी पाताडे, रोहित अगाम, असिफ शेख, सुभाष वाघमारे, शैलेश मुदीराज, संतोष शर्मा, मुजाहिद पठाण, एजाज पठाण, फारूख शेख, राजपूत, संजय, संतोष साहू, गजानन सावंत, अहमद यांनी पंच म्हणून काम पाहिले.
रांगोळीत शैला जाधव, ऋतू सोनी होममिनिस्टर
By admin | Updated: September 27, 2014 23:18 IST