शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात

By admin | Updated: July 30, 2014 01:03 IST

हिंगोली : शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता रिसला बाजार, गारमाळ, ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली.

हिंगोली : शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता रिसला बाजार, गारमाळ, ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर एकमेकांच्या भेटी घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या.पवित्र रमजान महिन्यातील रोजा सोमवारी चंद्रदर्शनानंतर सुटला. मंगळवारी सकाळी ईदगाह मैदानावर नमाज अदा झाल्यानंतर मुस्लिम बांधवांना राजकीय मंडळींसह पदाधिकारी उपस्थित होते. महसूल, नगर परिषद आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने अधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी खा. राजीव सातव, आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, ज्येष्ठ पत्रकार शरद जयस्वाल, रिपाइंचे मधुकर मांजरमकर, जहीरभाई इटवाले उपस्थित होते. शहरात दिवसभर शिरखुर्माचे कार्यक्रम झाले. संघटना, पक्ष, लोकप्रतिनिधींनीही या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. औंढा येथे कार्यक्रमऔंढा नागनाथ : येथील ईदगाह मैदान व जामा मशीद या दोन ठिकाणी मुस्लिम बांधवानी सार्वजनिक नमाज अदा करून रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. औंढा येथील ईदगाह मैदानावरच पूर्वी रमजान ईद साजरी होत होती. प्रार्थनेस जागा अपुरी पडत असल्याने दोन्ही ठिकाणी ईद साजरी करण्यात आली. या ठिकाणी मुतवली रफियोद्दीन खतीब व मौलाना हाफेज अहेमद खान यांनी नमाज पठण केल्यानंतर रमजान ईद उत्साहात साजरी करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस उपअधीक्षक निलेश मोरे, तहसीलदार श्याम मदनूरकर यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे ईद मिलापचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सरपंच वसंत मुळे, उपसरपंच माणिक पाटील, सुनील रसाळ, ग्रामविकास अधिकारी रमेश मोरे, नायब तहसीलदार मधुकर खंडागळे, जी.डी.मुळे, गुलाम मुर्तीजा, सिंकदरखाँ पठाण, अझहर इनामदार, जकी काझी, जावेद इनामदार, शरद पाटील, मुंजाजी गोबाडे, संदीप गोबाडे, मोईन कादरी, सुमेध मुळे, मेहराज इनामदार, इब्राहिमखाँ पठाण, नीळंकठ देव, विजय महामुने, ताहेरखाँ पठाण, फारूख इनामदार, गौसोद्दीन इनामदार, सतीश दराडे, म. वसीम, वहाब पाशा कादरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कळमनुरीत उत्साहकळमनुरी : येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने २९ जुलै रोजी इदगाह मैदानावर सामुदायिकरीत्या ईदची नमाज अदा करण्यात आली.नमाजचे पठण मौलाना करीमोद्दीन यांनी केले. नमाजनंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शिरखुर्मा घेण्यासाठी एकमेकांना बोलावण्यात आले. ईदगाहवर सर्व मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. यावेळी खा. राजीव सातव, तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते, मुख्याधिकारी के.एम. वीरकुंवर, पोनि रविकांत सोनवणे यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर सपोनि चकोर, विनायक लंबे, मनीषा तायडे, सानप, कृष्णा चव्हाण, मार्के, गजानन राठोड, पोटे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.वसमत येथे कार्यक्रमवसमत : ईद-उल-फित्र वसमत येथे उत्साहात व शांततेत साजरी झाली. इदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. मुस्लिम बांधवांनी शुभेच्छा देण्यासाठी राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरवर्षीप्रमाणे वसमत येथील ईदगाह मैदानावर ईदची नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने हजर होते. नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांना विविध राजकीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देण्यासाठी आ. दांडेगावकर, अ‍ॅड. शिवाजीराव जाधव, नगराध्यक्ष भगवान कुदाळे, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, नवीनकुमार चौकडा, गटनेते शशीकुमार कुल्थे, राजेश पवार, आनंद बडवणे, जगदीश मोरे, पुरूषोत्तम ईपकलवार, दीपक हळवे, सुभाष लालपोतू, विनोद झंवर, गौतम मोगले, शिवाजी अलडिंगे, चिंतामण देशमुख, बालाजी जांभळे, उपविभागीय अधिकारी दीपाली मोतीयाळे, तहसीलदार अरविंद नरसीकर, डीवायएसपी पियुष जगताप, पोनि रवींद्र गायकवाड, मुख्याधिकारी श्रीनिवास कोतवाल, नगर अभियंता रत्नाकर अडसिरे आदींची उपस्थिती होती. नंतर शिरखुर्मा पार्टीचे आयोजन केले होते.सेनगाव तसेच भांडेगावात ईद साजरीसेनगाव : येथे मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम समाजबांधवांनी सामूहिक नमाज अदा केली.मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमास तहसीलदार आर.के. मेंडके, पोनि एस.एम. फुलझळके, मनसे जिल्हा सचिव संदेश देशमुख, डॉ. गणेश देशमुख, देवानंद दिनकर आदींंनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. भांडेगाव : येथे मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्त मशिदीमध्ये मुस्लिम समाजबांधवांनी सामूहिक नमाज करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांनी रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.