शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

स.भु.च्या अध्यक्षपदी राम भोगले, तर दिनेश वकील उपाध्यक्षपदी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:06 IST

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी प्रख्यात उद्योगपती राम भोगले हे आज झालेल्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांनी विद्यमान अध्यक्ष बॅ. जवाहर गांधी यांना पराभूत केले. अ‍ॅड. दिनेश वकील यांची यापूर्वीच उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे.

औरंगाबाद : सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी प्रख्यात उद्योगपती राम भोगले हे आज झालेल्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांनी विद्यमान अध्यक्ष बॅ. जवाहर गांधी यांना पराभूत केले. अ‍ॅड. दिनेश वकील यांची यापूर्वीच उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे.स.भु. मध्यवर्ती कार्यालयात आज सकाळी १० ते ३ या वेळेत स.भु. शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाची निवडणूक झाली. एकूण ८४ मतदारांपैकी ७५ मतदारांनी मतदान केले. त्यातले एक मत अवैध ठरले.राम भोगले यांना ४३ मते मिळाली, तर बॅ. गांधी यांना ३१ मते मिळाली. आश्रयदाता सभासदांमधून प्राचार्य उल्हास शिवूरकर हे ४८ मते मिळवून विजयी झाले, तर ज्ञानप्रकाश मोदाणी यांना २७ मते मिळाली व ते पराभूत झाले. हितचिंतक सभासदांमधून प्रशांत देशपांडे हे विजयी झाले. त्यांना ४४ मते मिळाली, तर ओमप्रकाश राठी यांना २९ मते मिळाली व ते पराभूत झाले.सर्वसाधारण सभासदांमधून ११ उमेदवार निवडायचे होते. त्यासाठी एकूण १६ उमेदवार उभे होते. विजयी उमेदवारांची नावे अशी- डॉ. नंदकुमार उकडगावकर (६५ मते), डॉ. सुधीर रसाळ (५३ मते), डॉ. श्रीरंग देशपांडे (५१ मते), मिलिंद रानडे (४९ मते), माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर (४८ मते), अ‍ॅड. रामेश्वर तोतला (४८ मते), डॉ. सुहास बर्दापूरकर (४४ मते), अरुण मेढेकर (४४ मते), डॉ. रश्मी बोरीकर (४३ मते), माधव गुमास्ते (३८), जुगलकिशोर धूत (३७ मते)प्रमोद माने (३४ मते), अमोल भाले (३२ मते), डॉ. बाळकृष्ण क्षीरसागर (३५ मते), काशीनाथ नानकर (२२ मते) व सुहास पानसे (३५ मते) हे उमेदवार पराभूत झाले.डॉ. डी.डी. कायंदे यांनी मतमोजणी अधिकारी म्हणून काम पाहिले. प्रा. दिनकर बोरीकर यांच्या निधनानंतर बॅ. जवाहर गांधी हे अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळीत होते. आता स.भु.चे सरचिटणीस, सहसिचटणीस व कोषाध्यक्ष हे पदाधिकारी आज निवडून आलेले उमेदवार निवडतील. स.भु.मध्ये अध्यक्ष व सरचिटणीस या पदांना अधिक महत्त्व आहे. आता सरचिटणीसपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहावयाचे.स.भु. शिक्षण संस्था ही समाजवाद्यांची म्हणून ओळखली जायची. गोविंदभाई श्रॉफ यांनी या संस्थेचे अध्यक्षपद वर्षानुवर्षे सांभाळलेले. आता या संस्थेची प्रतिमा ‘समाजवादी’ अशी कितपत राहील, अशी शंका व्यक्त होत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद