परभणी : येथील महानगरपालिका अस्तित्वात येऊन तीन वर्षे होऊन गेली आहेत़ परंतु, मनपाचा कारभार ढिसाळ झाला आहे़ पंधरा दिवसांपासून मनपा आयुक्त रजेवर गेले आहेत़ या पदाचा कारभार कोणालाही दिला नाही़ त्यामुळे मनपाच्या कारभारावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही, असा आरोप मनपा विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे यांनी केला.शहराची लोकसंख्या ३ लाखापर्यंत आहे़ परंतु, महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास अपयश आले आहे़ सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू असताना पथदिवे बंद आहेत़ पाणीपुरवठा व्यवस्था ढासाळली आहे़ त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ तसेच मनपातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे त्या जागी नवीन अधिकारी आलेच नाहीत़ रिक्त जागांमुळे कामांचा खोळंबा झाला आहे़ शहरातील घरकुल योजनेसाठी निधी असूनही कामे पूर्ण झाली नाहीत, अशा अनेक समस्या असतानाही सत्ताधारी पदाधिकारी व प्रशासनाचे याकडे लक्ष नाही, अशी खंत मनपा विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे यांनी व्यक्त केली़ तसेच पाणीपुरवठा, नगररचना कर अधीक्षक, यांत्रिकी या विभागात शहराच्या गरजा पुरविण्याकरिता कोणताही अधिकारी उपलब्ध नाहीत़ यामुळे परभणी शहर महानगरपालिकेची अवस्था रामभरोसे झालेली आहे़, असे मनपाचे विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)अर्ध्या शहरातील पथदिवे बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे़ घंटागाड्या दुरुस्ती अभावी शहराची स्वच्छता होत नसल्याने जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे़ पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा
महानगरपालिकेचा कारभार रामभरोसे
By admin | Updated: July 14, 2014 00:59 IST