शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

वाळूज महानगर सिडकोत महिलांचा जलकुंभावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:49 PM

महिलांनी शनिवारी सिडको जलकुंभार मोर्चा काढून पाणी देण्याची मागणी केली. महिलांचे रौद्र रुप पाहून कर्मचारी टँकरने पाणी देवून महिलांची कशीबशी समजूत घातली.

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात सध्या पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. आठवड्यातून एकदा तेही कमी दाबाने पाणी मिळत असल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत. संतप्त महिलांनी शनिवारी सिडको जलकुंभार मोर्चा काढून पाणी देण्याची मागणी केली. महिलांचे रौद्र रुप पाहून कर्मचारी टँकरने पाणी देवून महिलांची कशीबशी समजूत घातली. मात्र, यावेळी नियमित पाणी दिले तरच मतदान करु अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय रहिवाशांनी घेतला.

सिडको वाळूज महानगरातील एमआयजी व एलआयजी भागात पाण्याची गंभीर स्थिती आहे. अनेकवेळा मागणी करुनही वेळेवर पाणी मिळत नसल्याने महिलांनी शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास थेट सिडकोच्या जलकुंभावर मोर्चा काढला. महिला जलकुंभार धडकल्याची माहिती मिळताच सिडको अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने टँकरने पाणी देण्याचे आश्वासन दिले. मात्र, महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. अखेर कर्मचाºयांनी पाण्याचा टँकर देत महिलांची कशीबशी समजूत काढत शांत केले. पाण्याचा टँकर घेवूनच महिला माघारी परतल्या. यावेळी हसन शेख, महेश निकम, तुषार वडकते, प्रदीप गाडे, सचिन तांबे, ओमकार देशमुख, कविता आदीक, संगीता तिगोटे, अनिता मिठे, सरिता खोमणे, मीरा नाटकर, रेखा देशमुख, मनिषा चव्हाण, राधा भवर, अलका साळुंके, शोभा वाघ, मनिषा सैदाणे, रुख्मिणी तांबे, लता जाधव, अनिता मिठे, किरण घायवट, मंगल वानरे, वर्षा वानरे, मंगल आमलापुरे प्रतिभा पवार, कांता जाधव, शीला लोखंडे आदींची उपस्थिती होती.

चार दिवसांआड हवाय पाणी पुरवठाएमआयजी भागाला सुरळित पाणी पुरवठा केला जात नाही. आठवड्यातून एकदा पाणी मिळते तेही कमी दाबाने. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. याविषयी अनेकवेळा सांगूनही प्रशासन याकडे लक्ष देत नाही. सिडको प्रशासनाने चार दिवसांआड नियमित सुरळित पाणीपुरवठा केला नाही तर आम्ही येणाºया निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

टॅग्स :Walujवाळूजwater scarcityपाणी टंचाई