शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
2
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
3
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
4
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
5
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
6
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
7
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
8
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
9
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
10
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
11
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
12
सुनेवर अत्याचार, पतीचं बाहेर अफेअर; दीप्तीच्या भावाने 'कमला पसंद'च्या मालकाच्या कुटुंबावर केले आरोप!
13
बाजारात 'सुपर फास्ट' कमबॅक! बजाज-रिलायन्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी; फक्त २ स्टॉक्स घसरले
14
चीनची दादागिरी संपणार! EV आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक 'रेअर अर्थ' खनिजांसाठी सरकारचा मोठा प्लॅन
15
घरासाठी कर्ज घेण्यास लोकांचा सरकारी बँकांवर जास्त भरोसा; ४० टक्के कर्ज ७५ लाखांपेक्षा अधिक
16
MCX च्या शेअरनं गाठला ₹१०,२५० चा उच्चांकी स्तर; ₹१२,५०० पर्यंत जाऊ शकतो भाव, काय म्हणाले एक्सपोर्ट
17
झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
18
'टेस्ला मॉडेल Y' भारतात २० लाखांनी स्वस्त होणार? कंपनीचा मोठा दावा, किंमत नाही, मालकी खर्च कमी होणार...
19
अल-कायदाचा कमांडर; पाकिस्तानमध्ये लपलाय हाफिज सईदपेक्षा मोठा दहशतवादी, अमेरिकेच्या टार्गेटवर!
20
FBI चे प्रमुख काश पटेल यांनी गर्लफ्रेंडला पुरवली कमांडो सुरक्षा, नोकरी जाण्याची चर्चा; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सेवालाल महाराज यांच्या जयंंतीनिमित्त औरंगाबादेत उत्साहात रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 23:58 IST

संत शिरोमणी सेवालाल महाराजांच्या जयंतीचा आज अमाप उत्साह पाहावयास मिळाला. वाहन रॅलीत सहभागी होऊन शेकडो युवक वसंतराव नाईक चौकातील पुतळ्यापर्यंत आले आणि तेथे त्यांनाही मन:पूर्वक अभिवादन केले.

ठळक मुद्देलक्षवेधी रॅली : वाहनस्वार शेकडो युवक सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : संत शिरोमणी सेवालाल महाराजांच्या जयंतीचा आज अमाप उत्साह पाहावयास मिळाला. वाहन रॅलीत सहभागी होऊन शेकडो युवक वसंतराव नाईक चौकातील पुतळ्यापर्यंत आले आणि तेथे त्यांनाही मन:पूर्वक अभिवादन केले.आॅल इंडिया बंजारा टायगर्सने दुपारी क्रांतीचौकातून काढलेली वाहन रॅली लक्षवेधी ठरली. लाल रंगांचा फेटा बांधून शेकडो युवक या रॅलीत सहभागी झाले होते. हातात लाल-पांढरा आणि पिवळे रंग असलेले झेंडे होते. काही जणांच्या हातात पांढºया रंगाचेही झेंडे होते. बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबूराव पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तसेच वाहन रॅलीत असलेल्या संत सेवालाल महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजनही त्यांनी केले.या रॅलीचे नेतृत्व आॅल इंडिया बंजारा टायगर्सचे संस्थापक अध्यक्ष व राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. अशोक राठोड, उपाध्यक्ष वनसिंग चव्हाण यांनी केले. ही रॅली सिल्लेखाना चौक, बंजारा कॉलनी, सम्राट अशोक चौक, मोंढा नाका, आकाशवाणीसमोरून सेव्हन हिल उड्डाणपुलावरून कॅनॉट प्लेस, वसंतराव नाईक चौक येथे आली आणि तेथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी बाबूराव पवार यांनी सेवालाल महाराजांबद्दल माहिती देऊन बंजारा समाज हा संघटित होणे ही काळाची गरज आहे, यावर भर दिला. सेवालाल महाराजांनी देशभरातील बंजारा समाज बंधू-भगिनींना स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा दिली. सेवालाल महाराजांचे विचारच बंजारा समाज संघटित होण्यास कारणीभूत ठरत आहेत आणि त्यांचे प्रेरणादायी विचारच बंजारा समाजाला एक ना एक दिवस देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळवून देणार आहेत, असा आशावादही बाबूराव पवार यांनी यावेळी व्यक्त केला. अ‍ॅड. रमेश टी. राठोड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.‘लालेम लाल एकच लाल सेवालाल’, हा आवाज कुणाचा... आॅल इंडिया बंजारा टायगर्सचा, एकच टायगर, बंजारा टायगर, एक बंजारा... लाख बंजारा, जगात भारी... १५ फेब्रुवारी अशा जोशपूर्ण घोषणा रॅलीभर देण्यात आल्या.शंकर पी. चव्हाण, राकेश पवार, राजेंद्र जाधव, रमेश तोफाननाईक, बबन चव्हाण, संतोष राठोड, राजू चव्हाण, मानसिंग राठोड, शुभम चव्हाण, पंडित चव्हाण, मदन चव्हाण, गोरख चव्हाण, विजय चव्हाण, नीतेश चव्हाण, मधुर चव्हाण, आकाश चव्हाण, प्रकाश चव्हाण, साहेबराव चव्हाण, गोरख राठोड, धामसिंग राठोड, प्रताप राठोड, नीलेश जाधव, मोहन चव्हाण, देवीदास राठोड, राजू पवार, पंडित चव्हाण आदींनी या रॅलीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.