शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधन : कोरोनाने कोणाचा भाऊ, तर कोणाची बहीण रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 16:58 IST

ऐन रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाही अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले.

ठळक मुद्देभावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना, बहिणीच्या रक्षणाचे वचनजिल्ह्यात ३ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात कोणाची बहीण आहे, कोणाचा भाऊ आहे.

औरंगाबाद : बहीण-भावाचे नाते सांगणारा सण म्हणजे ‘रक्षाबंधन.’ या दिवशी भाऊ बहिणीकडे ओवाळणीसाठी जात असतो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे कोणाचा भाऊ रुग्णालयात आहे, तर कोणाची बहीण. मात्र, कोरोनावर मात करून बहिणीकडून राखी बांधून घेणार, भावाला ओवाळणार, असा विश्वास भाऊ-बहिणींनी व्यक्त केला.

जिल्ह्यात ३ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात कोणाची बहीण आहे, कोणाचा भाऊ तर काही रुग्णालयात भाऊ-बहिण दोघे आहेत. याशिवाय ऐन रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाही अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. त्यांना उपचारासाठी घाटीत, जिल्हा रुग्णालयात, मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये भरती व्हावे लागले. रक्षाबंधननिमित्त जेथे अनेकांना बहिणीकडून ओवाळून घेण्याचे, राखी बांधून घेण्याचे वेध लागले आहेत; परंतु या सणाच्या दिवशीच रुग्णालयात थांबण्याची वेळही अनेकांवर ओढावली. 

बहीण भावाला राखी बांधून भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुख-शांतीसाठी प्रार्थना करते. तसेच, यानिमित्ताने बहिणीच्या रक्षणाचे वचन भावाकडून दिले जाते; परंतु आज नाही तर उद्या उपचार घेऊन घरी परतणार आहेच. तेव्हा हा सण साजरा करू, अशा भावना रुग्णांनी व्यक्त केल्या. रुग्णालयात रुग्णांसोबत रक्षाबंधन साजरा करण्याच्या दृष्टीने जिल्हा रुग्णालय, घाटी रुग्णालयात कर्मचा-यांकडूनही नियोजन केले जात आहे.

पूर्वसंध्येला परतले घरी : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला कोरोनावर उपचार घेऊन घाटी, कोविड केअर सेंटरमधून विविध भागांतील रुग्ण घरी परतले. रक्षाबंधनासाठी भाऊ, बहीण घरी परतले, याचा आनंदही अनेकांना मिळाला. 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या