शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

राकाँचे थाळीनाद आंदोलन

By admin | Updated: October 26, 2015 00:05 IST

बीड : भाजपा सरकारच्या वर्षभराच्या काळात महागाई २०० टक्क्यांनी वाढली असून, दुष्काळात भर पडली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे

बीड : भाजपा सरकारच्या वर्षभराच्या काळात महागाई २०० टक्क्यांनी वाढली असून, दुष्काळात भर पडली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाईच्या विरोधात काढलेल्या थाळीनाद आंदोलनाप्रसंगी राकाँचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर बोलत होते.अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून भाजपा सत्तेवर आली आहे. परंतु जीवनावश्यक गोष्टींचे भाव वाढले आहेत. केंद्रातील मोदी सरकारला दीड वर्षाचा तर राज्यातील युती सरकारला सत्तेवर येऊन वर्ष होत आहे. या वर्षभराच्या कालावधीत महागाईने कळस गाठला आहे. ४० रूपये किलो असणारी दाळ २४० रूपयांवर जाऊन पोहचली आहे. इतर सर्व वस्तूंचे भाव दुपटीने, तिपटीने वाढले आहेत. वर्षभरातच वाढलेल्या या महागाईला भाजपा सरकारचे धोरण कारणीभूत असून या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जीवन बिकट बनले आहे, असे डॉ. क्षीरसागर म्हणाले.महागाईचा जाब विचारून सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्याच्या उद्देशाने बीड येथे राकाँ जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यशवंत उद्यान, डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात झालेल्या आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात महिला थाळी व बेलणे घेऊन सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिलांनी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. यामुळे परिसर दणाणून गेला होता.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. क्षीरसागर म्हणाले, आघाडी सरकार असताना अनेक महत्वाचे चांगले निर्णय घेण्यात आले. आघाडी सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवले होते. भाजपचे सरकार आणि नेते हे व्यापाऱ्यांच्या हितांची धोरणे राबवत आहेत. त्यामुळे महागाईने कळस गाठला आहे.आंदोलनात जेष्ठ नेते मोईन मास्टर, शेख शफीक, विलास विधाते, अ‍ॅड. हेमा पिंपळे, हेमलता चांदणे, परमेश्वर सातपुते, अ‍ॅड. वर्षा दळवी, प्रिया डोईफोडे, शालिनी परदेशी, नगराध्यक्षा रत्नमाला दुधाळ, उपनगराध्यक्ष नसीम इनामदार, फारूक पटेल, अ‍ॅड. महेश धांडे, बबन वडमारे, विष्णू वाघमारे, गणेश वाघमारे, नागेश तांबारे, परवीन यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या. (वार्ताहर)