व्यंकटेश वैष्णव, बीडजिल्ह्यात वाळू तस्करीच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत आहे़ जिल्ह्यात केवळ सहाच अधिकृत वाळू उपसे आहेत़ त्यातील दोनच वाळू पट्ट्यातून वाळू घेवून जाण्याचे कंत्राट संबंधित ठेकेदारांना दिलेले आहे़ असे असताना देखील सर्वच ठिकाणच्या वाळू पट्यांमधून राजरोसपणे वाळू उपसा होत आहे़ अवैध वाळू उपशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात पहावयास मिळत आहे़बीड जिल्हयात एकूण सहा वाळू पट्टे आहेत़ यामध्ये माजलगाव तालुक्यातील डुब्बाधडी येथे एक वाळू पट्टा आहे़ गेवराई तालुक्यात तपेनिमगाव, रामपुरी, भोगलगाव, आगर नांदूर, राक्षसभुवन या ठिकाणाहून वाळूचा उपसा होतो़ यातील केवळ दोन ठिकाणाहूनच वाळू उपसा करण्यासाठी कंत्राट दिलेले आहे़ यामध्ये आज घडीला राक्षसभुवन व रामपुरी या ठिकाणाहूनच अधिकृत वाळू उपसा केला जातो़ अधिकृत वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणावरून दिवसाकाठी शंभरच्या जवळपास ट्रक दिवसाकाठी वाहतूक करतात़ मात्र जे वाळू पट्टे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार बंद आहेत तेथून दिवसाकाठी ५० ते ६० ट्रक अवैध वाळूची तस्करी होत आहे़ प्रशासन आठ-दहा दिवसाला ५-१० दहा वाळूच्या ट्रकांवर कारवाई करून प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करत आहे़ आज स्थितीला केवळ दोनच वाळूपट्टे सुरू असताना देखील बीड जिल्ह्याला वाळू भरमसाठ पुरविली जात आहे़ एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळू येते कोठून, असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांनी केला आहे़याबाबत गेवराई तहसिलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले की, यापुर्वी आम्ही अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केलेली आहे़ त्यांच्या या उत्तरावरून जिल्ह्यात अवैध वाहतूक होत असल्याच्या प्रकरणावर शिक्कामोर्तब झाला आहे़ पर्यावरण व रस्त्याची दुरावस्थाप्रचंड प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे़ या बरोबरच गेवराई तालुक्यातील ठिकठिकाणच्या वाळू पट्यांमधून वाळू भरून जाणाऱ्या जड वाहनांमुळे छोटे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेले असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहे़जिल्ह्यात वाळू तस्करांचा धिंगाणा सुरू असताना प्रशासनाने मात्र डोळ्यावर पट्टी बांधली आहे़४वाळू पट्टे कमी आणि उपसा भरमासाठ अशी स्थिती असताना कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़४अवैध वाळू उपशावर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाकडून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बडगा उगारला जात आहे़४त्यामुळे साप सोडून भुई धोपटण्याचा प्रकार घडत आहे़४अवैध वाळू उपशावर कठोर कारवाईची आवश्यकता आहे़
राजरोस वाळू तस्करी
By admin | Updated: September 12, 2014 00:27 IST