शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरेंचे उदात्तीकरण करणाऱ्या राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी - श्रीमंत कोकाटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 15:14 IST

राज ठाकरे यांच्या सभेला विरोध नाही, चुकीच्या विचारांना विरोध असेल

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांची बदनामी करणाऱ्या जेम्स लेनचा खरा 'ब्रेन' बाबासाहेब पुरंदरे आहेत. अन् अशा पुरंदरेंचे राज ठाकरे हे सतत समर्थन करतात, हे आक्षेपार्ह आहे. शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांना कायम मदत करणाऱ्या राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी जेष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे. त्यांनी आज शहरातील पत्रकारांशी संवाद साधला.

राज ठाकरे यांनी 'मशिदींवरील भोंगा हटाव' मोहीम सुरु केल्यानंतर औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा घेण्याचे जाहीर केले आहे. सभेला विरोध आणि समर्थन दोन्ही वाढत जात असल्याने सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यातच राज ठाकरे यांनी मागील सभेत दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला होता. जेम्स लेन, बाबासाहेब पुरंदरे आणि शिवाजी  महाराजांची बदनामी यावर जेष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेला आज पत्रकार परिषदेतून विरोध दर्शवला आहे. जेम्स लेन यांचे खरे 'ब्रेन' बाबासाहेब पुरंदरे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांची बदनामी करणाऱ्या पुरंदरे यांचे राज ठाकरे यांनी कायम समर्थन केले आहे. लेनला मदत करणाऱ्या डॉ. श्रीकांत भोवलकर यांची ठाकरे यांनी घरी जाऊन मागितली आहे. बदनामीच्या कटामध्ये राज ठाकरे यांचा सहभाग आहे. बदनामी करणाऱ्यांना ठाकरे यांनी त्यावेळी मदत केली आहे, आणखीही त्यांच्या बदल झाला नाही. त्यामुळे ठाकरे यांनी महाराष्ट्राची, सर्व शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी अशी मागणी कोकाटे यांनी यावेळी केली.

सभेला विरोध नाहीराज ठाकरे यांच्या सभेला आमचा विरोध नाही. ते सातत्याने जी चुकीची मांडणी करत असतात त्याला आमचा विरोध राहील. पुरंदरेंचे समर्थन करतात यावर आमचा आक्षेप आहे, असेही कोकाटे यांनी स्पष्ट केले. ठाकरे यांनी माफी मागितली नाही तर यापुढेही लोकशाहीमार्गाने त्यांचा विरोध करत राहू अशा इशारा कोकाटे यांनी यावेळी दिला.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRaj Thackerayराज ठाकरे