शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

राजकारणात नव्याने सुरुवात करणाऱ्या राज ठाकरेंच्या विलीनीकरणावरील मताला महत्व देत नाही : गुणरत्न सदावर्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 17:40 IST

Adv. Gunaratna Sadavarte : विलीनीकरणाच्या लढ्यात आम्हाला अनेक अनुभवी लोकांनी पाठिंबा दिला आहे, राज ठाकरेंच्या मताला महत्व देत नाही.

औरंगाबाद : एसटी विलीनीकरणाच्या लढ्यात अनेक अनुभवी लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. यामुळे राजकारणात नव्याने सुरुवात करणाऱ्या राज ठाकरे ( Raj Thackarey ) यांनी एसटीचे विलानीकरण ( ST Strike ) होणार नाही असे वक्तव्य केले आहे, या त्यांच्या खाजगी मताला मी जास्त महत्व देत नाही, असा खोचक टोला अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते ( Adv Gunaratna Sadavarte ) यांनी लगावला. अ‍ॅड. सदावर्ते यांनी आज औरंगाबाद येथील संपकरी एसटी कर्मचाऱ्याची भेट घेतली. 

राज्य शासनात एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मागील महिनाभरापासून संप पुकारला आहे. सोमवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी १३ डिसेंबर हि कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याची डेडलाईन दिली होती. मात्र, संप अजूनही सुरुच असून सर्व कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, आज अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातील संपकरी कर्मचाऱ्यांची आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास भेट घेतली. यावेळी त्यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण होणार असून आम्ही जिंकणार आहोत. आमच्यासोबत संविधान आहे, अशी ग्वाही दिली.

राज ठाकरेंची राजकारणात नव्याने सुरुवात तसेच यावेळी अ‍ॅड. सदावर्ते यांनी राज ठाकरे यांनी एसटीचे विलीनीकरण होऊ शकत नाही या वक्तव्याचा समाचार घेतला. विलीनीकरणाच्या लढ्यात आम्हाला अनेक अनुभवी लोकांनी पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांच्या राजकारणाची नव्याने सुरुवात झाली असून त्यांच्या खाजगी मताला मी महत्व देत नाही, अशी खोचक टीका अ‍ॅड. सदावर्ते यांनी केली.

विलीनीकरण घेऊनच राहणार सगळा पिटारा मी उघडणार नाही, २० डिसेंबरला सरकारने पूर्ण तयारीनिशी यावे. आम्ही विलनिकरण घेऊनच राहणार. नसता शाळकरी मुलांपासून ते दूध वाटप करणाऱ्यांपर्यंत सर्वांना सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषाला या सरकार ला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी अ‍ॅड. सदावर्ते यांनी दिला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेST Strikeएसटी संपAurangabadऔरंगाबाद