शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा अहवाल कुलाबा वेधशाळेकडे

By admin | Updated: July 24, 2016 00:46 IST

लातूर : लातूर जिल्हा अवर्षणग्रस्त म्हणून गेल्या तीन वर्षांपासून पुढे आला आहे. यंदाही पावसाने हुलकावणी दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

लातूर : लातूर जिल्हा अवर्षणग्रस्त म्हणून गेल्या तीन वर्षांपासून पुढे आला आहे. यंदाही पावसाने हुलकावणी दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ढग भरून येत आहेत. मात्र पाऊस पडत नसल्याने कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी होत आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा करण्यात आला असल्याने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने लातूर जिल्ह्यातील पावसाचा आढावा कुलाबा वेधशाळेकडे पाठविला आहे. गेल्या १० वर्षांची पावसाची परिस्थिती यात मांडण्यात आली असून, आॅगस्ट महिन्यात लातूर जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची शक्यता आहे.लातूर जिल्ह्यात मांजरा धरण आहे. परंतु फेब्रुवारी २०१६ पासून कोरडेठाक आहे़ लातूर शहरासाठी रेल्वेने मिरजहून तसेच निम्न तेरणाहून टँकरव्दारे पाऊस सुरू आहे़ गेल्या वर्षभराच्या तुलनेत चालू वर्षातील मोठे, मध्यम व लघुप्रकल्प अशा एकूण १४२ प्रकल्पामध्येही पाणी आलेले नाही़ जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील पाणी साठवणूक क्षमता ६९५़१८५ एमएमक्यूब इतकी आहे़ तर दोन मोठ्या प्रकल्पापैकी मांजरा कोरडे आहे व निम्न तेरणामध्ये १़ ६१९ दलघमी मृत पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे भविष्यातील टंचाईचे वेध लातूरकरांना लागले आहेत.जिल्ह्यातील दोन्ही प्रकल्प बीड-उस्मानाबाद जिल्ह्यात आहेत. या प्रकल्पांतर्गत १० मंडळे येतात. या कॅचमेंट भागात अपेक्षित पाऊस झालेला नाही. तर ज्या भागात झाला तो भाग कँचमेंट भागात येत नसल्याने त्या पावसाचा लातूर जिल्ह्यासाठी उपयोग होत नाही़ मांजरा, निम्न तेरणा, व्हटी, घरणी या प्रकल्पातील पाणीसाठी कमी होता. त्यातच पर्जन्यमानही झाले नसल्याने अनेक गावांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले़लातूर जिल्ह्यात गेल्या १० वर्षांपासून दरवर्षी पाऊस कमी-कमी होत गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात विंधन विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. भर पावसाळ्यात लातूर शहरासह ग्रामीण भागांतही टंचाईच्या झळा कायम आहेत. ढग भरून येत असले, तरी ते पडत नसल्याने कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ४गतवर्षी लातूर जिल्ह्यात सहा वेळा कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग झाला. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. गतवर्षीपेक्षा यावर्षी अधिक ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे यावर्षी हा प्रयोग राबविल्यास नक्कीच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे लातुरात विमानतळ, गोडावून व कृत्रिम पावसासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत.