शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहरासह जिल्हाभरात गारांचा अवकाळी पाऊस

By admin | Updated: April 29, 2017 23:33 IST

लातूर : शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी दुपारी ४ पासून वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाला सुरूवात झाली़

लातूर : शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी दुपारी ४ पासून वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाला सुरूवात झाली़ या पावसामुळे ग्रामीण भागात आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ तर अनेकांच्या घरावरील पत्रेही उडून गेल्याची घटना घडली आहे़ जिल्ह्यातील रेणापूर, चाकूर, उदगीर, औसा, निलंगा, शिरूरअनंतपाळ, देवणी, अहमदपूर, जळकोट आदी तालुक्यातही वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला़ रेणापूर तालुक्यात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घरासह पावसाला सुरूवात झाली़ हा पाऊस तालुक्यातील खरोळा, पानगाव, तळणी, मोहगाव, कारेपूर, अंदलगाव, निवाडा, पळशी, भोकरंबा आदी गावात पाऊस झाला़ यावेळी अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले़ तर शिरूरअनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथे हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या़ येरोळसह शिरूरअनंतपाळ तालुक्यात ढगाळ वातावरण आणि थंड गारवा होता़ चाकूर तालुक्यातील जानवळ, वडवळ, रायवाडी, चापोली, शेळगाव, कलकोटी, उजळंब, कबनसांगवी, नळेगाव, घरणी, आष्टामोड आदी गावच्या परिसरातही हा पाऊस झाला़ या पावसामुळे चाकूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली तूर भिजली़ तर उदगीर तालुक्यातील एकूर्गा रोड, वाढवणा (बु), हाळी हंडरगुळी, गुडसूर, डोंगरशेळकी आदी परिसरातही पाऊस झाला़ हाळी हंडरगुळी परिसरात वादळी वारा आणि पाऊस झाल्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली़ वीजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला़ यावेळी जवळपास एक तास वीज गायब होती़ तर औसा तालुक्यातील आलमला, किल्लारी, उत्का, भादा, लामजना, भेटा, उजनी, आदी गावच्या परिसरात शनिवारी दुपारनंतर अवकाळी पावसाला सुरूवात झाली़ किल्लारी येथे वादळी वाऱ्यासह हा पाऊस झाला़