शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
4
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
5
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
6
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
7
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
8
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
9
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
10
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
11
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
12
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
13
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
14
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
15
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
16
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
17
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
18
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
19
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

एक चतुर्थांशच पाऊस

By admin | Updated: July 21, 2014 00:25 IST

जालना : जिल्ह्यात २० जुलैपर्यंत अपेक्षित सरासरीच्या केवळ एक चतुर्थांश इतकाच पाऊस झाल्याने दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली

जालना : जिल्ह्यात २० जुलैपर्यंत अपेक्षित सरासरीच्या केवळ एक चतुर्थांश इतकाच पाऊस झाल्याने दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली असून पाणीटंचाईबरोबरच खरिपाची आतापर्यंत झालेली पेरणी वाया जाते की, काय अशी चिंता व्यक्त केली जात आहे. गतवर्षी या तारखेपर्यंत २४४ मि.मी. पाऊस झाला होता. मात्र यावर्षी केवळ ६६.५३ मि.मी. पावसाची नोंद आहे. पाऊस लांबल्यामुळेच खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणात खोळंबल्या आहेत. तसेच सर्वदूर चिंतेचे वातावरण पसरले आहे. या परिस्थितीत शासनाच्या सुचनेनुसार पिण्याच्या पाण्यासह चाराटंचाईसंदर्भात सर्वतोपरी उपाययोजना अवलंबिण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील पाणीसाठा आरक्षित करण्यात आला असून पाण्याचा अत्यंत काटेकोरपणे वापर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी सर्व संबंधितांना दिल्या आहेत. पाणीपुरवठा योजनांचेही स्त्रोत तपासून, त्यातून पुढील नियोजन करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १३ गावे आणि १४ वाड्यांना ३७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १२८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ७८ हजार २५३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यापैकी ५२ हजार हेक्टर क्षेत्र केवळ कपाशीचे आहे. मूग, उडीद या पिकांचे क्षेत्र कमी होणार आहे. आतापर्यंत सुमारे ५० टक्के खरीप पीक कर्जाचे वाटप झाले आहे. सप्टेंबर २०१४ पर्यंत पुरेल एवढा चारा जिल्ह्यात उपलब्ध आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनही सतर्क झाले असून टंचाईसंदर्भातील बैठका घेण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जलसाठा असलेल्या ठिकाणाहून पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी तहसीलदारांना कडक निर्देश दिलेले आहेत. शेतकरी मात्र आभाळाकडे डोळे लावून मोठ्या अपेक्षेने पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. (प्रतिनिधी)सर्व प्रकल्पांतील जलसाठा आरक्षितग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी विहिरींचे अधिग्रहण करणे तसेच टँकरची संख्या वाढविण्याचे काम होत आहे. मात्र त्याचबरोबर पाण्याचे स्त्रोत शोधून त्याद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजनही करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत ज्या धरणांमध्ये पाणी आहे, ते आरक्षित ठेवण्यात आले आहे. जालना शहराला जायकवाडी, घाणेवाडीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र सध्या नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या सहा दिवसांमध्ये शहराच्या काही भागात पाणीपुरवठा झालेला नाही.तालुकावार्षिक सरासरी अपेक्षित सरासरी झालेला पाऊसजालना६८६.२०२६१.४४८६.३८बदनापूर६८५.४०२८८.०६३८.८०भोकरदन६६२.८०२६०.११७७.५१जाफराबाद६४०.२०२३४.२०४५.००परतूर७४६.६०२३८.८५११८.८०मंठा७१२.९०२३३.८१३५.५०अंबड६६३.९०२१९.१९६९.८६घनसावंगी७०७.७०२४०.२३५४.४६एकूण६८८.२९२४४.२३६६.५३