लातूर : सलग दुसऱ्या दिवशीही लातूर जिल्ह्यास अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडले. विजेच्या तारा तुटल्याने काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. लातूर शहरात मळवटी रोड, इक्बाल नगर, सिद्धेश्वर वेस, देशपांडे गल्ली, रत्नापूर चौक, नांदेड नाका, शाहू चौक, साळे गल्ली, बौद्ध नगर, नाथ नगर, सनत नगर, बालाजी नगर भागांत अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाली आहेत. तसेच या भागांत काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. लातूर शहराच्या रिंग रोड बाहेरील वस्त्यांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. औसा, रेणापूर, निलंगा, चाकूर, उदगीर या तालुक्यांतही अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)
सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस
By admin | Updated: May 6, 2015 00:30 IST