हिंगोली : यंदाच्या खरीब हंगामात कशीबसी उवगवलेली पिके वाळू लागल्यानंतर सोमवारी पावसाने हजेरी लावली. तब्बल १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर बसलेल्या श्रावणधारामुळे पिकांना जीवदान मिळाले. जिल्ह्यात ५ आॅगस्ट रोजी शेवटचा पाऊस झाला होता. त्यानंतर उन्हाळ्यासारखे कडक ऊन पडू लागले. उगवला तो दिवस सारखाच निघाल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरूवात केली. जवळपास १३ दिवस पावसाने पाठ फिरवल्याने खडकाळ जमिनीवरील पिकांचे कोवळी पाने करपली. परिणामी पिकांची वाढ खुंटली, रोगांची लागन झाली. ओलाव्याअभावी रोगप्रतिकारक शक्ती राहिली नाही. आधिच पावसाला आणि पेरणीला उशीर झाल्याने यंदा पावसात सातत्या राहीले नाही. लोखो रूपये घालून बसलेल्या उत्पादकांनी आत्महत्या सुरू केली. दरम्यान, अनेक नक्षत्रे कोरडी गेल्यानंतर स्वातंक्षत्र्यदिनी मघा नक्षत्र उजाडले. सुरूवातीचे दोन दिवस कोरडे गेल्यानंतर गोकुळाष्टीमाच्या दिवशी दुपारी ४ वाजता पावसाचे पुन:रागमन झाले. दहीहंडीसाठी गोविंदाचा जल्लोष सुरू असताना श्रावणधारा बरसल्याने पिकांना वरदान मिळाले. जवळपास अर्धातास मध्यम स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यात झाला. गतवर्षी यावेळी ८९६ मिमी पाऊस झाला होता. यंदा १५८ मिमी पावसाच सरासरी थांबली आहे. (प्रतिनिधी)
१३ दिवसांच्या विश्रानंतर पाऊस
By admin | Updated: August 19, 2014 02:07 IST