महापालिकेने रेल्वेस्टेशनवर बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी सुरु केली आहे. त्याकरिता आरोग्य विभागाने दोन पथके तैनात केली आहेत. सचखंड एक्सप्रेस रेल्वेने दररोज २५० ते ३०० प्रवासी शहरात दाखल होत आहे. या सर्व प्रवाशांची अँटीजेन आणि आरटीपीसीआर टेस्ट केली जात आहे. आतापर्यंत सचखंड ने आलेल्या प्रवाशांपैकी २२ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यासोबतच विमानतळावर देखील मनपाचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. विमानाने येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर पध्दतीने कोरोना चाचणी केली जात असून या चाचणीचा अहवाल एक दिवस उशिराने मिळत आहे. आतापर्यंत विमानाने आलेल्या प्रवाशांपैकी ४ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह निघालेले आहेत. या संदर्भात मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर म्हणाल्या, रेल्वे आणि विमानाने येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. या चाचणीमुळे काही प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहे. ही चिंताजनकबाब असून याकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
विमानाच्या तुलनेत रेल्वे प्रवासी अधिक पॉझिटिव्ह
By | Updated: November 28, 2020 04:16 IST