शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बनावट मतदार कार्ड बनविणाऱ्या डिजिटल केंद्रावर छापा; दोन अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 14:22 IST

fake voter cards in aurangabad पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या दुकानावर बनावट ग्राहक पाठवले

ठळक मुद्देपुंडलिकनगर पोलिसांची कारवाई

औरंगाबाद: बनावट मतदार कार्ड बनवून निवडणूक आयोगाची फसवणूक करणाऱ्या गजानन कॉलनीतील डिजीटल केंद्र आणि महा ई सेवा केंद्रावर पुंडलिकनगर पोलीस आणि महसूलच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री छापा टाकून दोघांना अटक केली. आरोपीकडुन संगणक, प्रिंटर आणि मोबाईल असे साहित्य जप्त केले .

हरीश धुराजी वाघमारे (२२) आणि नवनाथ भक्तदास शिंदे (२६) अशी आरोपींची नावे आहेत . पुंडलिकनगर पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार गजानन कॉलनीतील मातोश्री डिजीटल या दुकानात बनावट मतदार कार्ड तयार केले जाते, अशी माहिती खबऱ्याने पोलिसाना दिली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या दुकानावर बनावट ग्राहक पाठवून नवीन मतदार कार्ड तयार करुन देता का अशी विचारणा करण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांचा पंटर ग्राहक बनून तेथे गेला. त्याने केलेल्या मागणीनुसार हरीश वाघमारे याने निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरुन माहिती मिळविली. 

या माहितीमध्ये मतदाराचे केवळ नाव आणि पत्ता, वय असते छायाचित्र नसते. यामुळे त्याने ग्राहकाचा नवीन पासपोर्ट साईज छायाचित्र घेऊन ओळखपत्र तयार केले. यावर निवडणूक विभागाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्याची बनावट इलेक्ट्रॉनिक ॲटोमॅटीक सही चिकटवली. यानंतर या मतदार कार्ड चे स्मार्ट कार्ड तयार करून देण्यासाठी त्याने त्याचा मित्र नवनाथ शिंदे याच्या महा ई सेवा केंद्राच्या ई मेल वर पाठविले. शिंदे हा मतदार कार्ड चे स्मार्ट कार्ड तयार करून देण्याचे काम करतो. 

यानंतर पोलिसांनी तेथील साहित्य जप्त केले आणि आरोपीसह महा ई सेवा केंद्रावर धाड टाकली . तेथे संगणक,प्रिंटर असा सुमारे ३९ हजार २०० रुपयांचा असा ऐवज जप्त केला. तहसीलदार शंकर लाड ,नायब तहसीलदार रेवणनाथ ताठे ,सपोनि सोनवणे, फौजदार विकास खटके, प्रभाकर सोनवणे, हवालदार रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, राजेश यदमळ आणि माया उगले यांनी ही कारवाई केली .

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी