शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

पॅकिंग कंपनीला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 01:15 IST

वाळूज एमआयडीसी बनकरवाडीतील लाकडी खोके व पॅलेट बनविणाऱ्या केदारनाथ पॅकिंग कंपनीला बुधवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी बनकरवाडीतील लाकडी खोके व पॅलेट बनविणाऱ्या केदारनाथ पॅकिंग कंपनीला बुधवारी (दि.१६) पहाटे २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत वेगवेगळ्े यंत्रे, संगणक, लॅपटॉप, कच्चा माल व इतर साहित्य जळून खाक झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.संजय भाताडे व सचिन भाताडे बंधूंची वाळूज एमआयडीसीतील बनकरवाडी (गट नंबर ४१) येथे ही कंपनी आहे. कंपनीत जवळपास १२० कामगार असून, वाळूज एमआयडीसीसह इतर कंपन्यास येथून पॅकिंगसाठी बॉक्स व पॅलेटचा पुरवठा केला जातो. मंगळवारी (दि.१५) सायंकाळी ५.३० वाजता काम बंद झाल्यानंतर रात्री ११.३० वाजेदरम्यान काही माल कंपनीत उतरवून कामगार घरी गेले. बुधवारी (दि.१६) पहाटे २ वाजेदरम्यान सुरक्षारक्षक रामहरी सोमाळे यांना कंपनीत आग लागल्याचे दिसून आले. सोमाळे यांनी ही माहिती कंपनीत राहणारे कामगार अमित सोनार यांना दिली. सोनार यांनी येऊन पाहिले असता आग चांगलीच भडकली होती. सोनार यांनी ही माहिती कंपनी मालक सचिन भाताडे यांना दिली.अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल होईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीच्या ज्वाला व धुराचे लोळ आकाशाकडे झेपावत होते. इलेक्ट्रिक वायरिंग व बोर्ड जळाल्याने कंपनीसह लगतच्या सामान भरलेल्या दोन खोल्याही आगीच्या भक्षस्थानी सापडल्या. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे फौजदार लक्ष्मण उंबरे, स.फौजदार वडगावकर, पोहेकॉ. गणेश अंतरप यांनी घटनास्थळी जाऊन आगीची माहिती घेतली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, कोट्यवधींचे नुकसान झाले. याप्रकरणी उशिरापर्यंत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती. आगीत कंपनीतील जवळपास ४० यंत्रे, हिट प्लँट, वीज जनित्र खोली, महागडे रबरवूड, पाईनवूड, ओएसबी प्लायवूड, साधे प्लायवूड, रबरसीट, ताडपत्रीचे रोल, लाकडी, लोखंडी व रबरी कच्चा माल, कार्यालयातील कागदपत्रे, कंपनीचे पत्रे, वायर,फलक व इतर साहित्य जळून खाक झाले. अन्य दोन सामानाच्या खोल्यातील ४ संगणक, २ लॅपटॉप, ३ प्रिंटरसह सर्वच साहित्य जळाले आहे.समयसूचकता दाखवून काही कामगारांनी मालाने भरून उभी असलेली तीन वाहने बाहेर काढल्याने बराच माल वाचला. या आगीत ६ ते ७ कोटींचे नुकसान झाल्याचा दावा कंपनी मालक सचिन भाताडे यांनी लोकमतशी बोलताना केला.

टॅग्स :MIDCएमआयडीसीfireआग