शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सलग दुसऱ्या वर्षीही आठवलेंच्या सभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 07:15 IST

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंची सभा सुरु असताना सुत्रसंचालन करणारे मिलिंद शेळके यांनी बाबासाहेबांचा नातू म्हणून घेणारा चोर आहे, असे उद्गार काढताच समोर बसलेला प्रचंड जनसमुदाय संतप्त झाला आणि खुर्च्यांची मोडतोड करू लागला.

औरंगाबाद : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंची सभा सुरु असताना सूत्रसंचालन करणारे मिलिंद शेळके यांनी बाबासाहेबांचा नातू म्हणून घेणारा चोर आहे, असे उद्गार काढताच समोर बसलेला प्रचंड जनसमुदाय संतप्त झाला आणि खुर्च्यांची मोडतोड करू लागला.

या सभेला पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. हा गोंधळ सुरु झाला तेव्हा प्रसंगावधान राखून जमावाला शांत करण्यासाठी पोलीस धावले. लाठीचार्ज न करता जमावाला शांत करीत जागेवर बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु संतप्त तरुणांनी खुर्च्यांची प्रचंड मोडतोड करीत घोषणाबाजी केली. तेव्हा हजारोंच्या संख्येने सभेसाठी जमलेला जमाव हा प्रकार पाहून सैरावैरा धावत सुटला.

यावेळी व्यापीठावर आठवले यांच्या भोवती त्यांच्या बॉडीगार्डने कडे केले. व्यासपीठावर बसलेले कार्यकर्ते खाली उतरले व जमावाला शांत करीत जागेवर बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रकार पाहून जवळपास अर्ध्यावर जमाव निघून गेला होता. त्यानंतर पुन्हा सभा सुरु झाली. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ प्रास्ताविकात म्हणाले, नामांतरचा हा लढा रामदास आठवले यांनी सलग १७ वर्षे लढला आणि तो यशस्वीही केला. या लढ्यात हजारो दलितांच्या घराची राखरांगोळी झाली. शेकडो भिमसैनिकांचे बळी गेले. बाळासाहेबांचा आाम्हाला आदर आहे. परंतु बाळासाहेब आपण या लढ्याला ‘ आऊट डेटेड इशू’ म्हणालात. माझे तुम्हाला पाच प्रश्न आहे. नामांतराच्या या लढ्यात तुम्ही कुठे होतात. खैरलांजी हत्याकांड झाल्यानंतर भोतमांगेला न्याय देण्याच्या लढ्यात आपण कुठे होता.

संयज ठोकळ यांचे प्रास्ताविक संपल्यानंतर सूत्रसंचालनासाठी मिलिंद शेळके यांनी माईक हातात घेतला व ते म्हणाले, तुम्ही त्यांना हेही विचारा बाबासाहेबांच्या पत्नी माईसाहेबांना अखेरच्या वेळी संभाळताना तुम्ही कुठे होता. पीईएसच्या जागेवर कार्यक्रम घेण्यासाठी २५-२५ हजार रुपये घेतले जातात. बाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे उद््गार ऐकताच व्यासपीठासमोर सभेसाठी बसलेला जमाव संतप्त झाला. त्यातील तरुणांच्या टोळक्याने खुर्च्यावर फेकत जोरदार घोषणाबाजी सुरु केली. जमाव सैरावैर पळू लागला.

बाबूराव कदम, नागराज गायकवाड, अ‍ॅड. गौतम भालेराव, टीपू सुलतानचे वंशज मन्सूरअली खान, खा. चंद्रकांत खैरे यांची भाषणे झाल्यानंतर रामदास आठवले यांच्या भाषणाने आजच्या या सभेचा शेवट झाला. आठवले आपल्या भाषणात म्हणाले, आजचा हा दिवस कोणावरही टिका टिप्पणी करण्याचा नाही. पक्ष वेगवेगळे असतील. पण ‘जय भिम’च्या नावाखाली आपण सर्व एकच आहोत. आपल्या समाजाच्या नेत्यांवर टिका करू नये. याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवायला पाहिजे. आजही आपले सर्व नेते व सगळा समाज एकत्र येत असेल तर मी मंत्रीपदाला लाथ मारायला तयार आहे. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे. ऐक्य होत असेल तर मंत्रीपद साडायाला आजही तयार आहे. मंत्रीपदे अशी येत असतात आणि जात असतात. एक कार्यकर्ता म्हणून मी सैदेव तुमच्या सोबत राहीन.

दगडफेकही झालीसंतप्त जमावाने खुर्च्यांची मोडतोड तर केलीच, पण समोर व्यासपीठाच्या दिशेने दगडफेक केली. यावेळी राजनंदीनी साऊंड सर्व्हिसचे संचालक किशोर बाबर यांच्या डोक्यात मोठी इजा झाली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

 

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारणNamantar Andolanनामांतर आंदोलन