शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रेबीज लससाठी रुग्णांंना ‘यातना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:26 IST

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे होणाºया जखमेच्या वेदनेबरोबर उपचारातील टोलवाटोलवी आणि लसींच्या टंचाईने रुग्णांना यातना भोगाव्या लागत आहेत. घाटीत ‘एआरव्ही’ लसीचा तुटवडा जाणवत आहे. मनपाकडून रुग्णांना ‘एआरएस’ लस दिली जात नाही. त्यामुळे उपचारासाठी आधी घाटी आणि नंतर मनपा रुग्णालय, अशा प्रकारे रुग्णांना चकरा माराव्या लागत आहेत.

ठळक मुद्देघाटीत ‘एआरव्ही’ नाही : महापालिका रुग्णांना देत नाही ‘एआरएस’, उपचारासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चकरा

औरंगाबाद : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे होणाºया जखमेच्या वेदनेबरोबर उपचारातील टोलवाटोलवी आणि लसींच्या टंचाईने रुग्णांना यातना भोगाव्या लागत आहेत. घाटीत ‘एआरव्ही’ लसीचा तुटवडा जाणवत आहे. मनपाकडून रुग्णांना ‘एआरएस’ लस दिली जात नाही. त्यामुळे उपचारासाठी आधी घाटी आणि नंतर मनपा रुग्णालय, अशा प्रकारे रुग्णांना चकरा माराव्या लागत आहेत.पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणाºया जखमेत रेबीजचे विषाणू असतात. रेबीजच्या विषाणूंना तातडीने नियंत्रणात न आणल्यास ते मेंदूपर्यंत जातात आणि रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे रुग्णांना तातडीने अ‍ॅन्टी रेबीज सिरम (एआरएस) देणे आवश्यक असते. त्यानंतर रुग्णांना अ‍ॅन्टी रेबीज व्हॅक्सिन (एआरव्ही) दिली जाते. घाटी रुग्णालयात तब्बल वर्षभरापासून ‘एआरव्ही’ उपलब्ध नाही. लसीसाठीही थेट मेडिकलचा, मनपाचा रस्ता दाखविला जातो. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाºया गोरगरीब रुग्णांची परवड होत आहे. घाटीत गतवर्षी ९ हजार रुग्णांवर उपचार केल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे म्हणाले, मोकाट कुत्र्यांमुळे जखमी होणाºया रुग्णांवर उपचाराची जबाबदारी ही महापालिकेची आहे. त्यांनी केवळ गंभीर रुग्णच घाटीत पाठविले पाहिजे.४ हजार ५५७ रुग्णांवर उपचारमहापालिकेच्या सिडकोतील एन-८, एन-११, बन्सीलालनगर, सिल्कमिल कॉलनी, कैसर कॉलनीतील रुग्णालयात ‘एआरव्ही’ लस दिली जाते. यावर्षी आतापर्यंत ४ हजार ५५७ रुग्णांना ही लस देण्यात आली आहे. सध्या मनपाकडे ७७९ ‘एआरव्ही’लस उपलब्ध आहेत. तर घाटीला ५०० ‘एआरएस’ लस देण्यात आल्याचे मनपाच्या वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी दररोज २० ते ३० रुग्ण येत असल्याचे सांगितले. परंतु यावर्षी ४१८ रुग्णांवर उपचार केल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली.गंभीर रु ग्णांनाच लसघाटीत २०० ‘एआरएस’ लस सध्या उपलब्ध आहे. मात्र, ‘एआरव्ही’ लस उपलब्ध नाही. गंभीर रु ग्णांना तात्काळ रुग्णालयातच लस दिली जाते. परंतु गंभीर जखमी नसलेल्यांना बाहेरून लस घेण्यास सांगितले जाते. यावर्षी आतापर्यंत मोकाट कुत्रा चावलेल्या ४१८ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.- डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक, घाटीघाटीला ‘एआरएस’चा पुरवठामहापालिकेच्या पाच रुग्णालयांत ‘एआरव्ही’ लस दिली जाते. महापालिकेकडून ‘एआरएस’ लस दिली जात नाही; परंतु रुग्णांच्या उपचारासाठी महापालिकेकडून घाटीला ‘एआरएस’ लस पुरविल्या जाते.-डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

टॅग्स :medicineऔषधंdogकुत्रा