शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

रुग्णांचा सवाल, डाॅक्टर कोरोना नसताना म्युकरमायकोसिस का झाला?

By संतोष हिरेमठ | Updated: August 26, 2022 13:32 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ‘म्युकरमायकोसिस’ने राज्यभरात एकच हाहाकार उडाला होता.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : डाॅक्टरसाहेब, मला तर कोरोना झालाच नव्हता, मग आता म्युकरमायकोसिस कसा झाला, असा सवाल रुग्णांकडून केला जात आहे. तिसऱ्या लाटेनंतर घाटी रुग्णालयात गुरुवारी म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या एका २२ वर्षीय महिलेची शस्त्रक्रिया झाली. म्युकरमायकोसिसग्रस्त झालेला टाळूचा भाग, नाकाच्या सायनसच्या पोकळीतील भाग काढण्यात आला. सुदैवाने तिचे डोळे वाचले. तिला कोरोनाची लागण झालेली नव्हती, मात्र १५ दिवसांपूर्वीच मधुमेहाचे निदान झाले. केवळ कोरोनाग्रस्तांनाच नव्हे तर इतर काही आजारांतील रुग्णांनाही म्युकरमायकोसिस होतो, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ‘म्युकरमायकोसिस’ने राज्यभरात एकच हाहाकार उडाला होता. कोरोनाच्या उपचारादरम्यान स्टिरॉइड्स, ऑक्सिजनमधील काही परिस्थितीमुळे म्युकरमायकोसिस होत असल्याचे सांगितले जात होते. परंतु, कोरोना झाला नाही म्हणजे म्युकरमायकोसिस होत नाही, हा गैरसमज आहे. घाटीतील कान-नाक-घसा विभागाच्या ओपीडीत गुरुवारी आलेल्या ७९ वर्षांच्या व्यक्तीलाही म्युकरमायकोसिस झाल्याचे आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात ८६ टक्के रुग्णांनी यशस्वी उपचार घेऊन या आजारावर मात केली आहे. या आजारामुळे डोळे काढावेच लागतात, हा समज घाटीतील डाॅक्टरांनी खोटा ठरविला. अनेक रुग्णांचे डोळे वाचविण्यात डाॅक्टरांना यश आले.

महिनाभरात दोघांवर शस्त्रक्रियामधुमेहासह इतर आजार की, ज्यामध्ये रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी होते, अशा रुग्णांना म्युकरमायकोसिस होण्याचा धोका असतो. महिनाभरापूर्वी एका म्युकरमायकोसिस रुग्णाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गुरुवारी २२ वर्षीय महिलेची शस्त्रक्रिया करून तिचे डोळे वाचविण्यात यश मिळाले.- डाॅ. सुनील देशमुख, कान-नाक-घसा विभागप्रमुख, घाटी

कोरोना नसलेले ३० टक्के रुग्णघाटीत गेल्या दोन वर्षांत म्युकरमायकोसिसच्या ३१२ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यातील ३० टक्के रुग्णांना कोरोना नव्हता. तरीही त्यांना म्युकरमायकोसिस झाल्याचे घाटीतील तज्ज्ञांनी सांगितले.

...यांना असतो धोकामधुमेहग्रस्त, कॅन्सरग्रस्त, मूत्रपिंड किंवा इतर अवयवांचे प्रत्यारोपण झालेल्या, डायलिसिसवर असलेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने 'म्युकर'चा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे या आजारांत अधिक काळजी घेण्याची गरज असते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी