शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीच्या हद्दीचा प्रश्न पेटला; संतप्त नातेवाईकांचा मृतदेहासह ग्रामपंचायतीसमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 12:23 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील पिशोर येथील प्रकार : स्मशानभूमीची कायमस्वरूपी हद्द काढून देण्याची मागणी

पिशोर ( औरंगाबाद ) : गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीच्या जागेवरून वाद होत असल्याने जागेची हद्द कायम करून द्यावी, या मागणीसाठी संतप्त होत नातेवाईकांसह समाजबांधवांनी पिशोर ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्ययात्रा रोखून ठिय्या दिला. जोपर्यंत स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत अंत्ययात्रा येथून हलणारच नाही, असा पवित्रा घेतल्याने पिशोरमध्ये काही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पिशोरमधील दिगर भागातील शांताबाई सूर्यभान खडके (७२) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी रात्री निधन झाले. महानुभवपंथाच्या परंपरेनुसार भुईडाग दिला जातो पण भुईडाग देण्याच्या जागेच्या हद्दीवरून गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी वाद सुरू आहे. त्यामुळे शांताबाई यांचे अंत्यसंस्कार कसे करायचे यावरून समाजबांधवांमध्ये चर्चा झाली. विशेष म्हणजे या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे अनेकदा मागणीदेखील केलेली होती. रविवारी सकाळी शांताबाई खडके यांची अंत्ययात्रा घरापासून निघाली ती थेट पिशोर ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच रोखली गेली.

संतापलेल्या नातेवाईकांसह समाजबांधवांनी मृतदेह ग्रामपंचायतीच्या आवारात ठेवला. अंत्यसंस्कार करण्यासाठी असलेल्या जागेवरून नेहमी वाद होत आहे. आम्हाला हद्द कायम करून दिली जात नाही. जोपर्यंत हद्दीचा प्रश्न सोडविला जाणार नाही, तोपर्यंत मृतदेह हलविणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. त्यामुळे ग्रामपंचायतीसमोर काही काळ तणाव निर्माण झाला होता. ग्रामपंचायत पदाधिकारीही समोर येईनात. काही लोक प्रश्न मार्गी लागेल, अशी समजूत घालून अंत्यसंस्कार उरकून घ्यावा, अशी विनंती करत होते. परंतु संतप्त समाजबांधवांसह नातेवाईकांनी कोणाचेही एक ऐकले नाही.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली मध्यस्थीग्रामपंचायतीसमोरच मृतदेह ठेवल्याने ग्रामस्थांनी गर्दी जमली होती. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने काही लोकांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना फोनवरून माहिती दिली. जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तहसीलदारांशी संपर्क साधून अनेक वर्षांपासून हा प्रश्न रखडला आहे. कायम वाद होत असल्याने यावर त्वरित तोडगा काढावा, अशी विनंतीवजा सूचना केली. त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी अंत्यविधी आटोपून घ्यावा, अशी विनंती नातेवाईकांना केली. त्यानंतर नातेवाईकांनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधी पार पाडला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूgram panchayatग्राम पंचायत