शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

३०० मेट्रिक टन कचरा प्रक्रियेचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 22:57 IST

महापालिकेतर्फे चिकलठाण्यात उभारण्यात येत असलेल्या १५० मेट्रिक टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पास महावितरणने वेळेवर वीजपुरवठा केल्यास ३१ मार्च २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, पडेगाव आणि हर्सूल येथील प्रकल्पाची कूर्मगती पाहता हे दोन्ही प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की मनपावर ओढावल्यास शहरातील ३०० मेट्रिक टन कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे.

ठळक मुद्देचिकलठाण्यात एकच प्लांट : १५० मेट्रिक टनची क्षमता

औरंगाबाद : महापालिकेतर्फे चिकलठाण्यात उभारण्यात येत असलेल्या १५० मेट्रिक टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पास महावितरणने वेळेवर वीजपुरवठा केल्यास ३१ मार्च २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, पडेगाव आणि हर्सूल येथील प्रकल्पाची कूर्मगती पाहता हे दोन्ही प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की मनपावर ओढावल्यास शहरातील ३०० मेट्रिक टन कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे.शहराच्या कचराकोंडीला येत्या १६ फेब्रुवारीस एक वर्षे पूर्ण होणार आहे. मागील वर्षभरात महापालिकेने नेमके काय केले, असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेला महाराष्टÑ शासनाने तब्बल ९० कोटी रुपये दिले. खिशात पैैसा असूनही महापालिकेला वर्षभरात एकही कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा करता आला नाही. चिकलठाण्यात एकमेव प्रकल्प उभा राहत आहे. त्याची क्षमता १५० मेट्रिक टन आहे. याच ठिकाणी १६ टन क्षमतेच्या दोन छोट्या मशीनही बसविण्यात आलेल्या आहेत. त्यातून दररोज ३२ मेट्रिक टन, असे एकूण १८२ मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया होईल.पडेगाव येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा होता; परंतु तेथे काम करू नये, असा निर्णय सामाजिक न्याय विभागाने दिला. स्थानिक नागरिकांचा या कचरा प्रक्रिया प्रकल्पास विरोध आहे.हर्सूल येथे अत्याधुनिक पद्धतीने कचºयावर प्रक्रिया करण्याचे काम नागपूरच्या हायक्यूब कंपनीला देण्यात आले. दरावरून निर्माण झालेल्या वादामुळे हा प्रकल्पही आता रद्द झाल्यात जमा आहे. अशा परिस्थितीत महापालिका उर्वरित ३०० मेट्रिक टन कचºयाचे काय करणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पडेगाव येथे ३२ टन क्षमतेच्या छोट्या मशीन उभारणे, कांचनवाडीत ३० मेट्रिक टन क्षमतेचा बायोमिथेन प्रकल्प उभारण्यात येईल. १५० मेट्रिक टन सुका कचरा तयार होतो. त्याचे बेलिंग करण्यात येईल.मायोवेसल्सकडून प्रक्रिया नाहीचिकलठाणा येथे सुक्या कचºयापासून बेलिंग तयार करणारी यंत्रणा उभारण्यात यावी, असे आदेश मागील महिन्यात मनपाने मायोवेसल्स या कंत्राटदार कंपनीला दिले होते. कंपनीने आजपर्यंत कोणतीच यंत्रणा उभारली नाही. कंपनीचे लाड न करता नोटीस बजावण्याचे आदेशही पदाधिकाºयांनी दिले होते.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न