शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

औरंगाबाद शहरात आजपासून धावणार क्यू आर कोड स्टीकर्सच्या रिक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 13:02 IST

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने क्यू आर कोड स्टीकर्स सिस्टिम कार्यान्वित केली असून,  आवश्यक ती तयारी पूर्ण झाल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.  

औरंगाबाद : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने क्यू आर कोड स्टीकर्स सिस्टिम कार्यान्वित केली असून,  आवश्यक ती तयारी पूर्ण झाल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.   योजनेची अंमलबजावणी योग्य रीतीने व्हावी, यासाठी आरटीओ कार्यालयात बुधवारी बैठक झाली. 

शहरात विविध मार्गांवर धावणाऱ्या रिक्षांमध्ये प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन क्यू आर कोड असलेले स्टीकर्स बसविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. पंधरा दिवसांपासून याच्या जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. याची अंमलबजावणी योग्य त्या रीतीने व्हावी, यासाठी रिक्षाचालक आणि मालक संघटनांना प्रोत्साहन दिले जात आहे. या सिस्टिमची गुरुवारपासून अंमलबजावणी होत आहे.

क्यू आर कोडचे स्टीकर्स बसविण्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा आरटीओ कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. परवानाधारक, परवाना व चालकाचा तपशील या स्टीकर्समध्ये असणार आहे. याबाबतचे अर्ज रिक्षाचालकांनी भरून द्यावेत, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. रिक्षाचालकांनी फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट घेऊनच क्यू आर कोड स्टीकर्स रिक्षांमध्ये बसवावेत. तसेच दर्शनी भागातच हे स्टीकर्स चिटकविण्याचे आदेश आहेत. 

स्टीकर्सची वैशिष्ट्ये- प्रत्येक स्टीकरला युनिक नंबर आहे. - स्टीकर्सला सेक्युरिटी फीचर्स आहेत. - स्टीकर्स न फाटणारे, वॉटरप्रूफ व न पुसले जाणारे - स्टीकर्सवरील तपशील मराठी व इंग्रजी भाषेत आहे.- स्टीकर्सवरील क्यू आर कोड ३६० कोनामध्ये स्कॅन होऊन तो मोबाईलमध्ये तात्काळ स्टोर होतो.

रिक्षाची परिपूर्ण माहिती मिळणार क्यू आर कोड असलेल्या स्टीकर्समध्ये रिक्षाची परिपूर्ण माहिती असणार आहे. काही समस्या असल्यास ते मोबाईलमध्ये स्कॅन होऊन त्यात सर्व माहिती प्रवाशांना कळू शकणार आहे. यामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणण्याचा कार्यालयाचा प्रयत्न आहे.- श्रीकृष्ण नकाते, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबादpassengerप्रवासी