शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता व्यक्तीचा विहिरीत ढकलून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 23:09 IST

औरंगाबाद : दि. ९ एप्रिलपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा पैशाच्या वादातून विहिरीत ढकलून खून केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी ...

ठळक मुद्देपैशाचा वाद : जालना जिल्ह्यातील मौजपुरी परिसरात आढळला मृतदेह

औरंगाबाद : दि. ९ एप्रिलपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा पैशाच्या वादातून विहिरीत ढकलून खून केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.विजय देवीदास सुर्वे (४१, रा. शंभूनगर) असे मृताचे नाव आहे. त्यांची पत्नी पुष्पा या शहरातील एका खाजगी रुग्णालयात परिचारिका आहेत. त्यांना मुलगा आणि मुलगी आहे. ९ एप्रिल रोजी पुष्पा सुर्वे या कामावरून घरी आल्या असता मनोज शहादेव गवळी (रा. इंदिरानगर) आणि विजय सुर्वे यांच्यात वाद सुरू होता. गवळी हा विजय यांना सोबत चल म्हणून हट्ट करीत होता. त्यानंतर विजय सुर्वे पत्नीची दुचाकी (एमएच-२० डीवाय-५७९४) घेऊन निघून गेले. तेव्हापासून ते बेपत्ता होते. याबाबत त्यांच्या पत्नीने जवाहरनगर पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. १२ एप्रिल रोजी मनोज गवळी दोन वेळा सुर्वे यांच्या घरी गेला. त्याने विजय सुर्वेबाबत पुष्पाकडे विचारणा केली. तसेच सावरगाव (जि. जालना) येथे चला तीन तासांत विजय कुठे आहे ते दाखवतो, असेही मनोज गवळीने त्यांना सांगितले. त्यामुळे मनोज गवळीवर सुर्वे कुटुंबियांचा संशय बळावला होता. याच दरम्यान मौजपुरी ठाण्यातून पुष्पा सुर्वे यांच्या भावाला पोलिसांचा फोन आला. त्यांनी खात्री केल्यानंतर विहिरीतील मृतदेह विजय सुर्वे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी मनोज गवळीविरुद्ध जालना जिल्ह्यातील मौजपुरी ठाण्यात गुन्हा नोंद केल्यानंतर तो जवाहरनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.- जिवे मारण्याची धमकी दिली होतीमनोज गवळी किरायाने राहतो. किरायाच्या पैशाबाबत विजय सुर्वे यांनी त्याच्या घरमालकासोबत तडजोड करून दिली होती. २८ मार्चला सकाळी सुर्वे यांचा घरामागे राहणाऱ्या एका महिलेसोबत ड्रेनेजवरून वादही झाला होता. तेव्हा विजय सुर्वे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, असेही तक्रारीत नमूद आहे.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस