शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

पूस पाणीपुरवठा योजनेची वीज तोडली

By admin | Updated: September 4, 2014 01:26 IST

घाटनांदूर : गौरी, गणपती अशा महत्वपूर्ण सणउत्सवाच्या दिवसांत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूस आणि उद्भवन केंद्र अंबलवाडीचा वीजपुरवठा थकबाकीमुळे वीज वितरण कंपनीने तोडला आहे

घाटनांदूर : गौरी, गणपती अशा महत्वपूर्ण सणउत्सवाच्या दिवसांत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूस आणि उद्भवन केंद्र अंबलवाडीचा वीजपुरवठा थकबाकीमुळे वीज वितरण कंपनीने तोडला आहे. परिणामी सणासुदीच्या दिवसात योजनेवर अवलंबून असलेल्या घाटनांदूरसह तब्बल १९ गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जलजन्य आजारात वाढ होऊ लागली आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा पूस योजना आणि अंबलवाडी उद्भवन केंद्राचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने थकबाकीपोटी खंडित केला आहे. मे, जून व जुलै २०१४ या तीन महिन्यांचे एकूण चालू वीज बिल १२ लाख रुपये थकलेले आहे. वीज वितरण कंपनीने कुठलीही नोटीस न देता अचानक वीजपुरवठा खंडित करीत असल्याने प्रत्येकवेळी पाण्यासाठी भटकंती अटळ आहे. जिल्हा परिषदेंतर्गत असलेली पूस पाणीपुरवठा योजना सतत या ना त्या कारणाने बंदच असते. तुरटी, ब्लिचिंग पावडरचा तुटवडा तर दुरुस्ती साहित्याचा अभाव, कर्मचाऱ्यांची वाणवा यामुळे ही योजना सतत बंद असते. वीजपुरवठा सुरू असला तरी या ना त्या कारणाने ही योजना नेहमी बंद असते. सध्या सणासुदीचे दिवस असून, पाण्याची गरज भासते. अशा स्थितीत पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. अनेक गावांतून पूरक पाणीपुरवठा योजना असल्या तरीही एकाही गावाला पिण्यायोग्य शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. सध्या पावसाळा सुरू असल्याने सर्वत्र घाण पाणी, डबके, तुंबलेल्या नाल्या, रस्त्यावर चिखल दिसून येत आहे. यामुळे डासांचा उपद्रव वाढला असून, साथरोग फैलावत आहेत. अशा परिस्थितीत वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने अडचण निर्माण झाली आहे. १२ लाख रुपये थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने पूस पाणीपुरवठा योजना पुन्हा अडचणीत सापडली आहे. या योजनेवर अवलंबून असलेल्या गावांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे. याबाबत पूस योजनेचे शाखा अभियंता जी.बी. भुजबळ म्हणाले, योजनेवर अवलंबून असलेल्या गावाकडे तब्बल ३ कोटी ५० लाख रुपये पाणीपट्टी थकीत आहे. एकही ग्रा.पं. पैसे भरावयास तयार नाही. बील भरल्यास कनेक्शन जोडू. (वार्ताहर) पूस योजनेवर अवलंबून असलेल्या घाटनांदूरसह तळणी, दत्तपूर, अंबलटेक, तेलघणा, हनुमंतवाडी, पूस, गिरवली आपेट, गिरवली बावणे, साकूड, मुलतानतांडा, वरवटी, अंबलवाडी या अंबाजोगाई तालुक्यातील १३ तर परळी तालुक्यातील नंदागौळ, लेंडेवाडी, लेंडेवाडीतांडा, आनंदवाडी, नागदरा या पाच अशा १९ गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे.