शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रफुल्ल जटाळे यांनी पटकावला आयर्न मॅनचा किताब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 01:11 IST

औरंगाबादचे अनुभवी सायकलपटू व मॅरेथॉनमधील धावपटू डॉ. प्रफुल्ल जटाळे यांनी नुकताच आयर्न मॅन किताब पटकावला. अशी कामगिरी करणारे ते मराठवाड्यातील पहिले सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर ठरले. ही कामगिरी त्यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत केली आहे.

औरंगाबाद : औरंगाबादचे अनुभवी सायकलपटू व मॅरेथॉनमधील धावपटू डॉ. प्रफुल्ल जटाळे यांनी नुकताच आयर्न मॅन किताब पटकावला. अशी कामगिरी करणारे ते मराठवाड्यातील पहिले सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर ठरले.ही कामगिरी त्यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत केली आहे. आयर्न मॅन किताब पटकाविण्यासाठी खेळाडूंला ३.८ कि.मी. स्विमिंग, १८0.२ कि. मी.सायकलिंग आणि ४२.२ कि. मी. धावावे लागते.हे सर्व एकाच वेळी न थकता १७ तासांत पूर्ण करावे लागतात. तथापि, प्रफुल्ल जटाळे यांनी हे तिन्ही प्रकार १६ तास आणि ३0 मिनिटांत पूर्ण करून आयर्न मॅन किताबावर शिक्कामोर्तब केले.यासाठी त्यांनी ५ महिन्यांपासून तयारी केली होती. दररोज पहाटे १ तास रनिंग, एक तास सायकलिंग आणि सायंकाळी स्विमिंगचा सराव त्यांनी केला. ते मॅरेथॉनमधीलही चांगले धावपटू आहेत. २0१५ पासून ते मॅरेथॉनमध्ये सातत्याने सहभागी होत आहेत. त्यांनी लोकमत महामॅरेथॉनमध्ये दिशादर्शक म्हणूनही यशस्वीपणे कामगिरी केली आहे. २00, ३00, ४00 आणि ६00 कि.मी. बीआरएम स्पर्धेत सहभाग घेऊन त्यांनी ‘सुपर रँडॉननेर’ हा किताब पटकावला. हा किताब पटकावणारे ते मराठवाड्यातील पहिले डॉक्टर आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी डेक्कन क्लिफहंगेर (रेस अक्रॉस अमेरिका क्वॉलिफायर) पुणे ते गोवा, असे अंतर पूर्ण करून त्यांनी विजेतेपद पटकावले होते. विशेष म्हणजे त्यांनी २0१५ मध्ये न्युक्लिअर मेडिसनच्या परिषदेत ‘बेस्ट रीसर्च पेपर’ हा पुरस्कार पटकावला आहे, तसेच दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्या हस्ते त्यांना बेस्ट न्युक्लिअर मेडिसनतज्ज्ञ इन वेस्ट इंडिया अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या यशाबद्दल डॉ. उन्मेश टाकळकर, डॉ. अजय रोटे, तसेच क्रीडाप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.