शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

पुंडलिकनगर गल्ली नं. ३ व ५ मधील रस्ते झाले गुळगुळीत

By admin | Updated: July 13, 2014 00:45 IST

औरंगाबाद : सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे आणि ड्रेनेज लाईनचे उद्घाटन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.

औरंगाबाद : शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या आमदार निधीतून करण्यात आलेल्या पुंडलिकनगर गल्ली नं. ३ व ५ मधील सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे आणि भारतनगरमधील समर्थनगरमध्ये टाकण्यात आलेल्या ड्रेनेज लाईनचे उद्घाटन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी नागरिकांचा उत्साह आणि जल्लोष दिसून आला. विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीशी जनता समर्थपणे उभी असते, असे त्या कार्यक्रमांतून स्पष्ट झाले. रस्त्यांमुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे. पावसाळ्यात नागरिकांना रस्त्यांवरील चिखलामुळे त्रास होत असे. सिमेंट काँक्रिटीकरणातून झालेल्या गुळगुळीत रस्त्यांमुळे पुंडलिकनगर परिसर शहरातील हायप्रोफाईल वसाहतींच्या यादीत आला आहे. फटाक्यांच्या आतषबाजीत नागरिकांनी शिक्षणमंत्र्यांचे स्वागत केले. पुंडलिकनगर वॉर्ड क्र. ८३, गल्ली नं.५ मधील चव्हाण यांच्या घरापासून जनता मेडिकलपर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे व श्रीनाथ ज्वेलर्स ते नाल्यापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे, गल्ली नं. ३ मधील कल्याण कावरे यांच्या घरापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत सिमेंट रस्त्याचे, तसेच त्याच गल्लीतील गजानननगर ते मुख्य रस्त्यापर्यंत सिमेंट रस्त्याचे लोकार्पण शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले.या कार्यक्रमांना नगरसेवक सूर्यकांत जायभाये, साई शेलार, अशोक दामले, सिद्धार्थ वडमारे, बसवराज पवार, शिवा महाले, अभिमन्यू खंडारे, कृ.उ.बा.चे माजी संचालक पंक ज फुलपगर, गौतम माळकरी, जालिंदर शेंडगे, राधाकृष्ण गायकवाड, दामोदर शिंदे, बबन डिडोरे, भागवत भारती, बापू आवारे, भगवान भोसले, कल्याण कावरे, दिगंबर सोनवणे, नारायण पारटकर, सचिन भालेराव, ज्योती भालेराव, रंगनाथ खेडकर आदींसह परिसरातील शेकडो महिला व नागरिकांची उपस्थिती होती.भारतनगरमधील ड्रेनेज लाईनचे उद्घाटन वॉर्ड क्र. ८२, भारतनगर येथे टाकण्यात आलेल्या ड्रेनेज लाईनचे उद्घाटन परिसरातील ज्येष्ठ नागरिक व्यवहारे काका यांच्या हस्ते झाले. ड्रेनेज लाईन झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहणार नाही. ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळे सांडपाण्याचे डबके साचून साथरोगांचा प्रादुर्भाव होत असे. ड्रेनेज लाईनसाठी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी निधी दिल्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले. यावेळी डॉ. बाबासाहेब पैठणे, मुकेश सोनवणे, शेख रईस, अ. रहीम पटेल, अनिल बरगे, देवराव लुटे, दीपक साळवे, आबा चंदनसे, विकास उगवले, पिंजरकर, काकडे यांच्यासह अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.