शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

परंडा, उमरग्यात युतीची शक्यता, इतरत्र स्वबळ ?

By admin | Updated: November 11, 2016 00:30 IST

उस्मानाबाद पालिका निवडणुकीसाठी उमेदारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी अखेरचा दिवस आहे.

विशाल सोनटक्के उस्मानाबादपालिका निवडणुकीसाठी उमेदारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी अखेरचा दिवस आहे. त्यामुळे ११ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील आठही पालिका निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, शिवसेना, भाजपा युतीसाठीची बोलणी गुरूवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. उमरगा आणि परंडा पालिकेत सकारात्मक बोलणी झाल्याने येथे युतीची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, उर्वरित ठिकाणी शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष जवळपास स्वबळ आजमावण्याच्या मनस्थितीत आल्याचे बैठकीअंती स्पष्ट झाले. राज्यात शिवसेना, भाजपासह महायुतीचे सरकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांतही राज्य पातळीवर शिवसेना-भाजपाने युतीची घोषणा केली आहे. मात्र, युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे या दोन्ही पक्षांनी जाहीर केले होते. त्यानुसार मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील शिवसेना, भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू होत्या. शिवसेनेने प्रारंभीपासून नगराध्यक्षपदाच्या बहुतांश जागांवर दावा ठोकलेला आहे. त्यामुळेच युतीबाबतची बोलणी जिल्हा स्तरावर रेंगाळली होती. शिवसेनेची ही भूमिका शेवटच्या दिवसापर्यंत कायम असल्याचेच दिसून आले. उस्मानाबाद आणि कळंब या दोन्हीपैकी नगराध्यक्षपदाची एक जागा भाजपाला सोडावी, अशी भाजपाची मागणी होती. मात्र, त्याला शिवसेना उशिरापर्यंत राजी झालेली नव्हती. भाजपाने रात्री उशिरा उस्मानाबादची नगराध्यक्षपदाची जागाही सोडण्याची तयारी दर्शविली. या बदल्यात कळंब, भूम, परंडा यापैकी एक जागा भाजपाला सोडा अशी त्यांची मागणी होती. मात्र, उस्मानाबादसह कळंबमध्ये सेनेचे प्राबल्य असल्याने यापैकी एकही जागा सोडण्यास शिवसेना तयार नव्हती. नगराध्यक्षपदाच्या बदल्यात भाजपाला नगरसेवकपदाच्या जागा जास्तीच्या देऊ, असा सेनेचा प्रस्ताव होता. तो भाजपाला मान्य नव्हता. या सर्व मुद्यांवर उशिरापर्यंत चर्चा झाली. मात्र, कुठलाही ठोस निर्णय न झाल्याने युतीची शक्यता जवळपास मावळल्याचे दिसून आले. दरम्यान, परंडा आणि उमरगा नगर पालिकेसाठी स्थानिक पातळीवर सेना-भाजपामध्ये युतीसाठीची चर्चा गुरूवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या दोन्ही ठिकाणी अवघ्या दोन-तीन जागांवर मतभेद असल्याचे बैठकीत दिसून आले. मात्र, चर्चेत सहभागी झालेले दोन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकारी युतीसाठी आग्रही असल्याने या दोन्ही ठिकाणी सेना-भाजपामध्ये युती होण्याची शक्यता बैठकीनंतर कार्यकर्र्त्यांतून व्यक्त होत होती. याबाबतचा निर्णय शुक्रवारी सकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे. असे असले तरी या दोन्ही ठिकाणी सेना आणि भाजपानेही स्वतंत्रपणे लढण्याचीही तयारी ठेवली आहे. दरम्यान, दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत आम्ही जिल्हाभरात युतीसाठी अजुनही सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.