शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे झाले गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:26 IST

लालबाग, कन्हैय्यानगर परिसरात बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचे दरवाजे गायब असल्याचे ‘लोकमत’ने गुरुवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले.

जालना : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जालना शहर हगणदारीमुक्त झाल्याचे पालिकेने ठराव घेऊन घोषित केले. मात्र, शहरातील अनेक भागात नागरिक आजही उघड्यावर शौचास जात आहे. लालबाग, कन्हैय्यानगर परिसरात बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचे दरवाजे गायब असल्याचे ‘लोकमत’ने गुरुवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले.जालना शहरात ४२ ठिकाणी नागरिक उघड्यावर शौचास जातात. ही ठिकाणी निष्कासित करण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम राबवली. गूड मार्निंग पथकामार्फत उघड्यावर शौचास जाणाºया नागरिकांवर पोलीस कारवाई करण्यात आली. तसेच ज्या भागात नागरिक उघड्यावर शौचास जातात अशा ठिकाणी प्राधान्याने सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. मात्र, देखभाल दुरुस्तीअभावी या स्वच्छतागृहांची काही महिन्यातच दुरवस्था झाली आहे. कन्हैय्यानगर भागातील बहुतांश शौचालये बंद आहेत. तसेच लालबाग परिसरात बसविण्यात आलेल्या स्वच्छतागृहांचे लोखंडी दरवाजे काहींनी गायब केले आहे. काही स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटल्यामुळे वापर बंद आहे. शिवाय या परिसरात नागरिक उघड्यावर शौचास बसत आहेत. त्यामुुळे स्वच्छतागृह बांधण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. जुना जालना भागातील संजयनगर, श्रीकृष्णनगर, मोतीतलाव भागातही नागरिक उघड्यावर शौचास जात असल्याचे दिसून आले.