औरंगाबाद : कोट्यवधी रुपये खर्च करून आठ महिन्यांपूर्वीच महापालिकेने विद्यापीठगेट ते लिटल फ्लॉवर चौकापर्यंतचा रस्ता गुळगुळीत केला होता. एका मोबाईल कंपनीने आपले केबल टाकण्यासाठी चक्क रोडवरच खोदकाम केले आहे. त्यामुळे महापालिकेने खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत.मराठवाड्यातील सर्वांत मोठे ज्ञानमंदिर म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे पाहिले जाते. या ज्ञानमंदिराची ‘वाट’ वर्षभरापूर्वी खूपच बिकट झाली होती. तत्कालीन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी जातीने लक्ष घालून विद्यापीठगेट ते लिटल फ्लॉवर रोड तयार केला. त्याचप्रमाणे ज्युबिलीपार्क ते पाणचक्कीपर्यंतचा रोडही त्यांनी तयार करून घेतला. या कामावर तब्बल १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. फेब्रुवारी २०१४ मध्ये या रस्त्यांची कामे पूर्ण झाली. मनपाने सर्वसामान्य नागरिकांच्या घामाच्या पैशातून हे दोन महत्त्वाचे रोड तयार केले. ज्या कंत्राटदारांनी ही कामे केली त्यांना अजूनही मनपाने पैसे अदा केलेले नाहीत. या रस्त्यांमुळे छावणी, विद्यापीठ आणि आसपासच्या परिसरातील राहणाऱ्या लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.
पब्लिक प्रॉपर्टीचा ‘सत्यानाश!’
By admin | Updated: December 1, 2014 01:25 IST