शहरं
Join us  
Trending Stories
1
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
2
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
3
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
4
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले
5
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
6
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
7
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
8
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय"
9
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
10
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
11
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य
12
Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस
13
Tata Harrier आणि Safari वर 1.25 लाखांपर्यंत डिस्काउंट तर अनेक कारवर मोठ्या ऑफर्स
14
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
15
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
16
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
17
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
18
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
19
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
20
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल

पं. गोविंदराव जळगावकर संगीत महोत्सवास प्रारंभ

By admin | Published: February 18, 2015 12:30 AM

अरूण घोडे/रवी गात , अंबड गायनाचार्य गोविंदराव जळगावकर स्मृतीनिमित्त श्री दत्त जयंती संगीत महोत्सवाची सुरुवात अत्यंत साधेपणाने झाली.

अरूण घोडे/रवी गात , अंबडगायनाचार्य गोविंदराव जळगावकर स्मृतीनिमित्त श्री दत्त जयंती संगीत महोत्सवाची सुरुवात अत्यंत साधेपणाने झाली.दरम्यान, माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या आकस्मिक निधनामुळे १६ फेबु्रवारी रद्द झालेल्या सर्व कलाकारांनी आपापल्या वेळेचे योगदान देऊन अत्यल्प वेळात आपली प्रस्तुती सादर करण्यास संमती देऊन वेळेवर कार्यक्रमाला सुरुवात केली. भक्तीप्रधान राग केदारमध्ये ईशस्तवन स्वरानंद सूर्यवंशी यांनी सादर केले. संवादिनीवर साथ शिवदास देगलुरकर तर तबल्यावर साथ गोविंदरावांचे चिरंजीव धनजंय जळगावकर यांनी दिली. दीपक भानुसे यांच्या बासरी वादनाने वातावरण तयार झाले. अत्यंत कमी वेळात बासरीवर राग बागेश्री त्यांनी अत्यंत प्रभावीपणे सादर केला. या समर्पक पण प्रभावी बासरीवादनानंतर मंजुषा पाटील यांनी समयानुरुप राग श्री ने सुरुवात केली. तिलवाडा तालात निबध्द ही रचना ग्वाल्हेर आग्रा घराण्याच्या सुंदर मिलापाने रसिकांच्या मनाची पकड घेतली. या गायिकीला दिलेला वेळ संपत आल्याने त्यांनी रसिकांनी विचारले असता रसिकांनी आणखी वेळ वाढवून दिला. मंजुषातार्इंनी भुपरागात ‘जब से तुम संग लागे ख्याल ’आणि द्रुत सादर केली. या ठुमरीने श्रीकृष्णाच्या रासलिलेचे वातावरण उभे केले. रासलिलांचे स्वरात्मक चित्र आपल्या समर्थ गायकीने इतके सुंदर रंगले की, रसिक हरखुन गेले. एखाद्या सिध्दहस्त चित्रकाराने आधी स्केच कराव ं(रेखाचित्र) आणि त्यानंतर रंग भरावे तसे रंग भरण्याचे काम रोहित मजुमदार यांच्या तालाने आणि उदय कुलकर्णी यांच्या संवादिनीने केले. मंजुषा पाटील यांच्या काळजाना हात घालणाऱ्या स्वरांनी रसिकांना खिळवून ठेवले. तेवढ्यात नाट्यगीत विधा आणि भजन यांचा एकत्र वापर करीत ‘जोहार माय बाप जोहार’ सादर केला. ‘जोहार माय बाप जोहार’ यातील जोहारच्या भेदकतेने रसिकांना घायाळ केले.