शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

घाटीत घडणार मनोचिकित्सक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 17:32 IST

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी)‘मनोविकृती’मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना याचा ...

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी)‘मनोविकृती’मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होईल आणि त्यातून मनोचिकित्सकतज्ज्ञ तयार होऊन मनोरुग्णांवरील उपचारात भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.संपूर्ण जिल्ह्यात किंवा विभागीय पातळीवर शासकीय मनोरुग्णालय नाही. प्रादेशिक मनोरुग्णालयाची वर्षानुवर्षे प्रतीक्षाच करावी लागत आहे. गेली काही वर्षे घाटीतील मनोविकृती आंतररुग्ण विभाग बंद होता. त्यामुळे गोरगरीब मनोरुग्णांना खाजगी रुग्णालय अथवा पुण्याला जाऊन उपचार घ्यावे लागत होते; परंतु दीड वर्षांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) मनोविकृती विभागाचा आंतररुग्ण विभाग कार्यान्वित झाला. जिल्ह्यात गोरगरीब रुग्णांना हा एकमेव आसरा आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यासह लगतच्या भागातील मनोरुग्णांवर उपचार होत आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ‘मनोविकृती’ पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी केली आहे. मनोविकृती विभागामध्ये डॉ. संजीव सावजी यांची प्राध्यापक म्हणून शुक्रवारी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी हे पहिले पाऊल ठरले आहे. आगामी काही दिवसांत अर्ज प्रक्रिया, पाहणी आदी प्रक्रिया होतील. घाटी प्रशासनाने २०२० मध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.उर्वरित प्रक्रिया होतील‘मनोविकृती’च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमामुळे मराठवाड्यातील विद्यार्थी तयार होतील. मनोचिकित्सक घडतील. सध्या प्राथमिक स्तरावर ही प्रक्रिया आहे. आगामी काही दिवसांत उर्वरित प्रक्रिया पार पाडल्या जातील, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयAurangabadऔरंगाबाद