शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सिटी स्कॅनसाठी घाटीला ५.५ कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:44 IST

घाटी रुग्णालयाला नवीन सिटी स्कॅन मिळण्यासाठी अर्थमंत्र्यांनी ५.५ कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली, तर शिर्डी संस्थानकडून एमआरआय मशीन मिळवून दिले जाईल, असे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयाला नवीन सिटी स्कॅन मिळण्यासाठी अर्थमंत्र्यांनी ५.५ कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली, तर शिर्डी संस्थानकडून एमआरआय मशीन मिळवून दिले जाईल, असे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. त्यामुळे घाटीत सिटी स्कॅन आणि ‘एमआरआय’च्या सुविधेत भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.घाटीत ६४ स्लाईड आणि ६ स्लाईड अशी दोन सिटी स्कॅन यंत्रे आहेत. या यंत्रामुळे गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळत आहे; परंतु या यंत्रांना अनेक वर्ष झाल्याने ती वारंवार नादुरुस्त होतात. त्यामुळे नवीन सिटी स्कॅनसह एमआरआय मशीन मिळण्याची मागणी घाटी प्रशासनाने केली. त्यासंदर्भात शासनाला प्रस्ताव दिला. शहरात सोमवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ५.५ कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली. त्यामुळे आगामी काही दिवसांत घाटीत नवीन सिटी स्कॅन दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला. २० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. यामध्ये सिटी स्कॅनसाठी ५.५ कोटी रुपये देण्यात येईल, असे सांगितले. हा निधी २०१८-१९ मध्ये मिळू शकेल,असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या.दंत महाविद्यालयास हवा निधीशासकीय दंत महाविद्यालयाच्या नव्या वसतिगृहातील फर्निचर आणि विद्युतीकरणासाठी २ कोटींचा निधी देण्याचे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिल्याचे अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे यांनी सांगितले. दीड वर्षांपूर्वी जुन्या वसतिगृहाच्या पुनर्वापरासाठी २० कोटींचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. महाविद्यालयाच्या इमारतीत व्हीआरएफ कुलिंग यंत्रणेसाठी ५.५ कोटींची मागणी केल्याचे डॉ. डांगे म्हणाले.