शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

रास्ता रोको करताच मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांची धरपकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 18:31 IST

Maratha Reservation मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता सुमारे ३०० ते ४०० तरुण-तरुणींनी हातात विविध फलक घेऊन घोषणा देत ठिय्या आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देआरक्षणासह विविध मागण्यांसाठी आंदोलन

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे क्रांती चौकात तासभर ठिय्या देण्यात आला. यानंतर आंदोलकांनी रास्ता रोकोचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांची धरपकड केली. यावेळी आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी क्रांती चौक दणाणून गेला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता सुमारे ३०० ते ४०० तरुण-तरुणींनी हातात विविध फलक घेऊन घोषणा देत ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी मराठा आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, सारथीचे औरंगाबाद शहरात केंद्र सुरू करा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटींचा निधी द्या, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत नोकरभरती करू नका, सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाला स्थगिती दिली तत्पूर्वीही निवड झालेल्या उमेदवारांना एसईबीसीच्या आरक्षणानुसार नियुक्तीपत्रे द्या, आरक्षण स्थगिती न्यायालयातून उठविण्यासाठी मनापासून प्रयत्न करा, यासह विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन घोषणा देत होते. सुमारे तासभर आंदोलन झाल्यावर आंदोलक अचानक चौकात उतरले आणि रास्ता रोको करू लागले. यामुळे पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करण्यास सुरुवात केली. रमेश केरे, किरण काळे यांच्यासह महिला आणि तरुण आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या वाहनात कोंबले. यावेळी पोलीस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे, पोलीस निरीक्षक दिलीप तारे, सहायक पोलीस निरीक्षक सूर्यतळ, फौजदार संतोष राऊत, अमोल सोनवणे, कर्मचारी योगेश नाईक, महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने बंदोबस्त तैनात केला होता.पाठलाग करून आंदोलक ताब्यातपोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू करताच आंदोलकांनी जोरदार घोषणा सुरू केल्या. एका वाहनाने काही लोकांना नेल्यानंतर दुसरे वाहन बोलावून अन्य आंदोलकांची धरपकड केली. यावेळी पळापळ सुरू झाल्यामुळे काही आंदोलकांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले आणि गाडीत कोंबले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद