शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कचरा टाकण्यास औरंगाबाद परिसरातून विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 13:01 IST

शहरात २५० ठिकाणी कचचे मोठमोठे डोंगर साचले आहेत. हा कचरा कुठेही नेऊन टाकण्याचा प्रयत्न मनपा अधिकारी व कर्मचारी मागील दोन-तीन दिवसांपासून करीत आहेत.

औरंगाबाद : शहरात २५० ठिकाणी कचचे मोठमोठे डोंगर साचले आहेत. हा कचरा कुठेही नेऊन टाकण्याचा प्रयत्न मनपा अधिकारी व कर्मचारी मागील दोन-तीन दिवसांपासून करीत आहेत. हिमायतबाग येथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाने बुधवारी बरेच प्रयत्न केले. मात्र, या प्रयत्नांना यश आले नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवरही असाच प्रयोग करण्याचे ठरविले असले तरी समिती हिरवी झेंडी दाखवायला तयार नाही. आज गांधेली येथे एका खाजगी व्यक्तीच्या जागेची पाहणी करण्यात येणार आहे.

शहरातील कचरा प्रश्नात मदत करण्यासाठी विविध संस्था, संघटना पुढे येत आहेत. व्यापारी महासंघाने कॅरिबॅग बंदीसाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मनपाला दिले. काही संस्थांनी रिक्षा, घंटागाड्या देण्याची तयारीही दर्शविली. गांधेली व आसपासच्या परिसरातील नागरिकांनी खाजगी जागा बघावी, असे निमंत्रण दिले आहे. या जागांची पाहणीही आज  मनपा करणार आहे. 

हर्सूल सावंगी येथे पिण्याच्या पाण्याच्या विहिरीजवळ बुधवारी कचरा पुरण्यात आला. याला स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध दर्शविला असून, एकाच पावसात सर्व कचरा विहिरीत जाईल, पिण्याचे पाणी दूषित होईल, असा आरोप करण्यात आला आहे. हर्सूल तलाव परिसरातील जांभूळवन येथेही कचरा टाकण्याची प्रक्रिया सुरूच आहे. मंगळवारी मध्यरात्री टी.व्ही. सेंटर परिसरातील स्वामी विवेकानंद उद्यानात लपून छपून कचरा पुरण्यात येत होता.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद