परभणी : येथील प्राथमिक शिक्षक जिल्हा शाखेच्या वतीने शिक्षकांच्या दोन महिन्यांचे वेतन व अन्य मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ९ जून रोजी सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात आले. प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जि. प. चे मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक शिक्षकांचे एप्रिल व मे महिन्याचे वेतन झाले नाही. यामुळे शिक्षकांना आपल्या पाल्याची पुढीा शिक्षणाची फीस भरणे अवघड झाले आहे. तसेच पुढील आठवड्यात शाळा सुरू होत आहे. त्यामुळे पाल्यांची शिकवणीची फीस, गणेश, पुस्तके घेणे अवघड झाले आहे. खरीप हंगामासाठी खते, बी-बियाणे पगार न झाल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या तत्काळ वेतन अदा करावे या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राम लोहट, जिल्हा संपर्क प्रमुख बाबासाहेब पाटील, कोषाध्यक्ष शेषराव राठोड, अध्यक्ष मधुकर कदम, रामराव रोकडे, दिलीप श्रृंगारपुतळे, प्रल्हाद मोरे, माणिक घाटूळ, दयानंद स्वामी, प्रभू मोरे, शेख रुस्तूम, महावीर अग्रवाल, पदमाकर जाधव, भागवतकर कुडे, नारायण जाधव, विलास भालेराव, गंगाधर लोखंडे, सी. एल. शिंदे, दिगंबर लगड, शिवाजी ब्याळे, नामदेव पतंगे, गुलाब बीडकर, राजेश कुलकर्णी, नवनाथ खंदारे, राजेश सातपुते, गुलाब रेंगे, अरूण चव्हाण, एन. आर. देशमुख, सोपान पांचाळ, सुधीर सोन्नरकर यांच्यासह तालुकाध्यक्ष व शिक्षक यांचा समावेश होता. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षकांचे वेतन तत्काळ देण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)अखेर वेतन देण्याचे आश्वासनआ. सतीश चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळाने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. डुंबरे यांची भेट घेतली. त्यावेळी डुंबरे यांनी प्राथमिक शिक्षकांचे दोन महिन्यांचे वेतन अदा करण्याचे आश्वासन दिले. यामध्ये सोनपेठ व पाथरी तालुका वगळता अन्य तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार देण्यात येणार असल्याचे सांगितले.
जि.प.समोर शिक्षकांचे वेतनासाठी धरणे आंदोलन
By admin | Updated: June 10, 2014 00:15 IST