शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीच्या इंटरचेंजमुळे ‘डीएमआयसी’ येणार वाहतुकीच्या प्रचंड रेट्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 11:56 IST

जालना ड्रायपोर्ट, मुंबई ते नागपूर, त्यातच डीएमआयसीतील वाहतूक, शहरातून मुंबई व नागपूरकडे जाणारी वाहतूक या इंटरचेंजचा वापर करील.

ठळक मुद्देऔद्योगिक गुंतवणुकीवर होऊ शकतो परिणाम डीएमआयसीमार्गे जालना रोडच समृद्धीला जोडला जाईल

- विकास राऊत

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत येणाऱ्या ऑरिक इंडस्ट्रीयल टाऊनशिप लि.(एआयटीएल) मधून जयपूर-भांबर्डा येथे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणाऱ्या इंटरचेंजमुळे वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढेल. एकप्रकारे समृद्धी महामार्ग डीएमआयसीमार्गे जालना रोडलाच जोडला जाणार आहे. यामुळे औद्योगिक वातावरणाला धक्का बसण्याची चिन्हे आहेत.

समृद्धी महामार्ग प्रस्तावित इंटरचेंजमुळे डीएमआयसीमार्गे थेट जालना रोडलाच जोडला जाणार असल्यामुळे आज जरी डीएमआयसीत उद्योगांची मोठी गुंतवणूक नसली तरी भविष्यात गुंतवणूक वाढल्यास वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होईल. जालना रोडवरून बीड व इतर जिल्ह्यांतून येणारी वाहतूक डीएमआयसीमार्गे इंटरचेंजवरून मुंबई किंवा नागपूरकडे वळेल. यामुळे वाहतुकीची कोंडी होणे शक्य आहे. सोबतच जालन्याकडून येणारी, चिकलठाण्यासह नवनगरमधून जाणारी आणि शहरातून मुंबई व नागपूरकडे जाणारी व येणारी वाहतूक याच इंटरचेंजचा वापर करू लागल्यास डीएमआयसीतील सर्व रस्ते वाहनांच्या गर्तेत येतील. जालना ड्रायपोर्ट, मुंबई ते नागपूर, त्यातच डीएमआयसीतील वाहतूक, शहरातून मुंबई व नागपूरकडे जाणारी वाहतूक या इंटरचेंजचा वापर करील. त्यामुळे ऑरिक सिटी परिसर हा प्रचंड वाहतुकीच्या विळख्यात येईल. औद्योगिक वसाहत वाहतुकीच्या वर्दळीत आल्यास त्याचे गुंतवणुकीवर मोठे परिणाम होतील. डीएमआयसीच्या उत्तर बाजूने साधारणत: पाऊण किलोमीटरवर समृद्धी महामार्गावरून इंटरचेंज कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. यामुळे जालना रोडमार्गे डीएमआयसी ऑरिक सिटीत इंडस्ट्रियल दळणवळण वाढून वाहतुकीची कोंडी वाढेल.

चाकण आणि तळेगाव येथे काय झालेचाकण औद्योगिक वसाहत ते तळेगाव येथे औद्योगिक वसाहतीत वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. त्याला कारण म्हणजे औद्योगिक आणि सार्वजनिक वाहतुकीची कनेक्टिव्हिटी एकत्र असणे आहे. असाच प्रकार डीएमआयसीत इंटरचेंजमुळे आगामी काळात होण्याची शक्यता आहे. नाशिक महामार्ग व तळेगाव, मुंबई महामार्गावर वाहतूक खोळंबत असल्याने ४५ कि.मी.चा नवीन रस्ता एमआयडीसीने तेथे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. डीएमआयसीत वाहतुकीची कोंडी वाढली तर पुन्हा नवीन रस्ता बांधावा लागेल.

औद्योगिक गुंतवणुकीवरही परिणामाची शक्यताचाकण आणि तळेगावमध्ये नव्याने गुंतवणूक वाढू लागली आहे. औद्योगिक वाहतुकीवर परिणाम झाल्यास या गुंतवणुकीबाबत साशंकता निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नवीन मार्ग उभारणीकडे एमआयडीसीने लक्ष केंद्रित केले आहे. असाच प्रकार इंटरचेंज कनेक्टिव्हिटीमुळे डीएमआयसीत होऊन वाहतुकीची कोंडी वाढली तर गुंतवणुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इंटरचेंजवरून होत असलेले दावे असेएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनबलगन यांनी दावा केला, सध्या तरी डीएमआयसीतून जोडण्यात येणाऱ्या इंटरचेंज रस्त्याचा शहरी वाहतुकीवर परिणाम होणार नाही. दहा वर्षांनंतर वाहतूक वाढेल, त्यानंतर परिणाम जाणवू शकेल. ४२ कोटींची रक्कम एमएसआरडीसीकडे वर्ग केल्याचेही त्यांनी सांगितले. ऑरिकमधून इंटरचेंज औद्योगिक वाहतुकीसाठीच केला जात आहे. औरंगाबादमध्ये इतर इंटरचेंज सामान्य वाहतुकीसाठी उपलब्ध असतील. शेंद्रा, चिकलठाणा, करमाड, बदनापूर परिसरातील वाहतुकीसाठी या इंटरचेंजचा फायदा होईल, तर डीएमआयसीचे सहसंचालक जितेंद्र कास्तुके यांनी दावा केला की, डोमॅस्टिक वाहतुकीचा राबता त्या इंटरचेंजमुळे वाढणार नाही, असे वाटते.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबाद