शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात केंद्रवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे

By admin | Updated: September 23, 2014 01:39 IST

औरंगाबाद : नवीन मतदारांची संख्या वाढल्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्याही वाढणार आहे. जिल्ह्यातील ११७ मतदान केंद्रे वाढविण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे

औरंगाबाद : नवीन मतदारांची संख्या वाढल्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्याही वाढणार आहे. जिल्ह्यातील ११७ मतदान केंद्रे वाढविण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिली.लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील मतदारांची संख्या २३ लाख इतकी होती, लोकसभा निवडणुकीनंतर आयोगाने सातत्याने मतदार नोंदणी मोहीम राबविली. त्यामुळे आता जिल्ह्यातील मतदारांची संख्या २४ लाख ४४ हजार इतकी झाली आहे. मतदारांची संख्या वाढल्यामुळे जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्याही वाढवावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या लक्षात घेऊन ११७ नवीन मतदान केंद्रे निर्माण करण्याचा प्रस्ताव आयोगाकडे सादर केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या २७४७ वर पोहोचणार आहे. नवीन मतदान केंद्रांपैकी सर्वाधिक ३७ केंदे्र औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात आणि ३५ मतदान केंदे्र औरंगाबाद मध्य मतदारसंघात प्रस्तावित करण्यात आली आहेत.औरंगाबाद पूर्व मतदारसंघातही ११ नवीन मतदान केंदे्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. तसेच गंगापूर मतदारसंघात १६, वैजापूर मतदारसंघात ३, पैठण मतदारसंघात ८, सिल्लोड मतदारसंघात ४, कन्नड मतदारसंघात २ आणि फुलंब्री मतदारसंघात १ नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने काही मतदान केंद्रांच्या जागांमध्ये बदल प्रस्तावित केले आहेत. जिल्ह्यातील १८४ मतदान केंद्रांच्या बाबतीत असे बदल सुचविले आहेत. मतदारांना अधिक सोयिस्कर ठरण्याच्या दृष्टीने हे बदल सुचविले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वाधिक ६७ केंद्रांचे बदल औरंगाबाद मध्य मतदारसंघात सुचविण्यात आले आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातही ५१ मतदान केंद्रांमध्ये बदल सुचविण्यात आले आहेत.