गंगाराम आढाव , जालनाजिल्ह्यात गत वर्षी अत्यल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील ७ मध्यम आणि ५७ लघू प्रकल्पापैकी ३४ प्रकल्पपूर्णपणे कोरडेठाक पडले होते. मात्र ८ जूनपासून सुरू झालेल्या मृग ृनक्षत्राच्या पावसाने सर्वत्र हजेरी लावल्याने काही प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असली तरी अद्यापही जिल्ह्यात सर्वत्र पाऊस न झाल्याने ११ लघू प्रकल्प कोरडेच आहे. जिल्ह्यातील ७ लघू प्रकल्पात १० तर ५७ मध्ये प्रकल्पात ३ टक्के उपयुक्त पाणी साठा असल्याने हे प्रकल्प अद्याप तहाणलेलेच आहे.जालना जिल्ह्यात ७ मध्यम प्रकल्प आहेत. त्यातील ४ प्रकल्पाचे पाणी जोत्याच्या खाली आहे. तर ३ प्रकल्पात अत्यल्प साठा आहे. या सातही प्रकल्पात उपयुक्त पाणी साठ्यांची क्षमता ६७.२९ दलघमी आहे.मात्र आज रोजी प्रत्यक्षात ६.८७ दलघमी म्हणजे केवळ १० टक्के उपयुक्त साठा आहे. तर ५७ लघू प्रकल्पात उपयुक्त पाण्याची क्षमता १६९.०९ आहे. मात्र प्रत्यक्षात ५.५१ दलघमी पाणी साठा म्हणजे केवळ ३ टक्के पाणीसाठा आहे. यातील ११ प्रकल्प कोरडे ठाक आहेत. तर ३३ प्रकल्पाची पाणी पातळी जोत्याखाली आहे. कल्याण गिरजा प्रकल्प (ता. जालना) मध्ये ४.५७ द.ल. घ.मी साठा म्हणजे ५४ टक्के पाणीसाठा आहे. कल्याण मध्यम प्रकल्प जोत्याच्या खाली. अप्पर दुधना प्रकल्प (ता. बदनापूर) जोत्याखाली, जूई मध्यम प्रकल्प ०.६९ दलघमी म्हणजे ११ टक्के, धामना मध्यम प्रकल्प (ता. भोकरदन) ज्योत्याच्या खाली, जीवरेखा मध्यम प्रकल्प (ता. जाफराबाद ) १.६१ दलघमी म्हणजे २६ टक्के साठा, गल्हाटी मध्यम प्रकल्प (ता. अंबड) चा जलसाठा जोत्याखाली आहे. या सात प्रकल्पा पैकी चार प्रकल्पाची पाणी पातळी जोत्याखाली आहे. ३ प्रकल्पात एकुण ६.८७ दलघमी म्हणजे १० टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत या प्रकल्पापैकी अप्पर दुधना प्रकल्प बदनापूर, कोरडा होता. तर उर्वरित प्रकल्पात एकुण ६.८२ म्हणजे १० टक्केच पाणीसाठा होता. जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पाची पातळी ज्योत्याखाली आहे. त्यात कल्याण मध्यम प्रकल्प, अप्पर दुधना प्रकल्प, धामना प्रकल्प व गल्हाटी प्रकल्पाचा समावेश आहे. तर ५७ लघू प्रकल्पापैकी ३३ प्रकल्पाची पातळी ज्यात्याखाली आहे. त्यात जालना तालुक्यातील वाकी बृ.ल.पा, दरेगाव, जामवाडी, नेर, कुंभेफळ, निरखेडा, बदनापूर तालुक्यातील आन्वी, सोमठाणा, राजेवाडी, भोकरदन तालुक्यातील बंरजळा, प्रल्हादपूर, पिंपळगाव कोलते, चांदई एक्को, पळसखेडा, बाणेगाव, जाफराबाद तालुक्यातील भारज, चिंचखेडा, ढोलखेडा, अंबड तालुक्यातील सुखापूरी, धनगरपिंप्री, खडकेश्वर, पानेगाव , घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ, मानेपूरी, बोरराजंणी, मंठा तालुक्यातील शिरपूर, सारवाडी, तळतोंडी, परतूर तालुक्यातील परतवाडी, बामणी, हस्तूरतांडा या प्रकल्पाचा समावेश आहे.
जिल्ह्यातील प्रकल्प अद्याप तहानलेलेच
By admin | Updated: June 21, 2015 00:18 IST