शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

संस्थाचालकांकडून प्राध्यापकांची अडवणूक

By admin | Updated: August 6, 2016 00:13 IST

नजीर शेख, औरंगाबाद ‘करिअर अ‍ॅडव्हान्समेंट स्कीम’ (कॅस) चे प्रस्ताव पाठविण्यासाठी अनेक संस्थाचालकांकडून प्राध्यापकांकडे प्रत्येकी वीस ते पंचवीस हजार रुपयांची मागणी होत असून,

नजीर शेख, औरंगाबाद‘करिअर अ‍ॅडव्हान्समेंट स्कीम’ (कॅस) चे प्रस्ताव पाठविण्यासाठी अनेक संस्थाचालकांकडून प्राध्यापकांकडे प्रत्येकी वीस ते पंचवीस हजार रुपयांची मागणी होत असून, अशी रक्कम न देणाऱ्या प्राध्यापकांचे प्रस्ताव विद्यापीठ आणि शिक्षण सहसंचालक कार्यालयापर्यंत जातच नसल्याचे चित्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या चार जिल्ह्यांतील कार्यक्षेत्रात सुमारे पाचशे प्राध्यापकांचे येत्या काही काळात ‘कॅस’ होणार आहे. यामधील प्राध्यापकांचे ‘प्रस्ताव’ संस्थाचालक चांगले असल्याने तयार झाले. मात्र अनेक संस्थाचालकांनी प्राध्यापकांकडे ‘कॅस’साठी प्रस्ताव पाठविण्याची रक्कम मागितल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली. एका ‘ग्रेड पे’मधून वरच्या ‘ग्रेड पे’ मध्ये जाण्यासाठी प्राध्यापकांचे ‘कॅस’ अंतर्गत प्रस्ताव मागविण्यात येतात. महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी अशा पात्र असलेल्या प्राध्यापकांची नावे विद्यापीठाकडे पाठवायची असतात. त्यानंतर ‘ग्रेड पे’ बदलण्यासंदर्भात प्राध्यापकांच्या वैयक्तिक मुलाखती घेऊन त्यावर निर्णय घेतला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षक संघटना (बामुटा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (बामुक्टो), महाराष्ट्र अंडरप्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशन (मुप्टा) आदी संघटनांनी वर्षातून दोन वेळा ‘कॅस’ घेण्याची मागणी केली होती. आगामी सप्टेंबर किंवा आॅक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. प्रस्ताव नाकारलेल्या एका प्राध्यापकाने दिलेल्या माहितीनुसार संस्थाचालकाने ६००० ग्रेड पे मधून ७००० ग्रेड पे मध्ये जाण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची मागणी केली. एका ‘ग्रेड पे’मधून वरच्या ‘ग्रेड पे’मध्ये गेल्यास एका प्राध्यापकाला साधारणत: मासिक दोन ते अडीच हजार रुपयांची वेतनवाढ मिळते. साधारणपणे वार्षिक ३० हजार रुपयांपर्यंत ही वाढ मिळते. प्राध्यापकांना मिळणारी ही आर्थिक वाढ संस्थाचालकांच्या डोळ्यात खुपते. त्यामुळे प्राध्यापकांना वाढीच्या रुपात मिळणारी एक वर्षाची रक्कम संस्थाचालक मागतात. येत्या महिन्या- दोन महिन्यांत विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत ‘कॅस’ होणार आहे. अनेक प्राध्यापकांनी नावे आणि प्रस्ताव पाठविण्याची विनंती प्राचार्यांकडे केली. मात्र ‘आर्थिक’ फायदा झाल्याशिवाय अनेक संस्थाचालक प्रस्ताव पाठविण्यास तयार नाहीत. प्राध्यापकांच्या अडवणुकीचे धोरण संस्थाचालकांनी अवलंबिल्याचे दिसत आहे. संस्थेत काम करावयाचे असल्याने प्राध्यापकही मुकाटपणे संस्थाचालकांची मागणी मान्य करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.