शहरं
Join us  
Trending Stories
1
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
3
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
4
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
5
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
6
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
7
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
8
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
9
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
10
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
11
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
12
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
13
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
14
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
15
पावसाचं थैमान! गाझियाबादमध्ये एसीपी ऑफिसचं छत कोसळलं, ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
16
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
17
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
18
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
19
"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
20
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...

वर्गात कॉपी सापडल्यामुळे मत्स्योदरी संस्थेकडून प्राध्यापक निलंबित, प्राचार्यास बजावली नोटीस

By राम शिनगारे | Updated: May 23, 2025 18:02 IST

जालन्याच्या मत्स्योदरी शिक्षण संस्थेची कारवाई; विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी मागील काही दिवसांपासून कॉपीमुक्त परीक्षा केंद्रासाठी धडक मोहीमच राबवली आहे.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी जालना येथील मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या विधि महाविद्यालयातील परीक्षा केंद्राला १७ मे रोजी भेट दिली होती. त्या भेटीत ४५ विद्यार्थ्यांना मास कॉपी करताना पकडले. या प्रकारामुळे संस्थेचे अध्यक्ष माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कॉपी झालेल्या वर्गावरील प्राध्यापकास निलंबित करण्याचा निर्णय घेतला. तसेच प्राचार्यांना नोटीस बजावून यापुढे कोणताही गैरप्रकार उघडकीस आल्यास आपणास जबाबदार धरले जाईल, असा इशारा दिला होता. या कार्यवाहीचा अहवालही संस्थेने कुलगुरू डॉ. फुलारी यांच्याकडे सुपुर्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी मागील काही दिवसांपासून कॉपीमुक्त परीक्षा केंद्रासाठी धडक मोहीमच राबवली आहे. जालना येथील मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या विधि महाविद्यालयास कुलगुरू डॉ. फुलारी यांनी १७ मे रोजी भेट दिली होती. या भेटीत त्यांनी ४५ विद्यार्थी कॉपी करताना पकडले. या प्रकारामुळे संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री राजेश टोपे यांनी संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्राचार्य टी. वाय. शेख यांनी वर्गावरील प्रा. डी. बी. बेंद्रे यांना खुलासा करण्यासाठी १७ मे रोजीच नोटीस बजावत खुलासा मागविला. त्यानंतर १९ मे रोजी प्रा. बेंद्रे यांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत. संस्थेचे अध्यक्ष टोपे यांनी प्राचार्य प्रा. टी. वाय. शेख यांना २२ मे रोजी नोटीस बजावत यापुढे परीक्षांमध्ये कॉपीचा प्रकार घडल्यास आपणास जबाबदार धरत कारवाई करण्यात येईल, असेही म्हटले आहे.

५३ पैकी २१ महाविद्यालयांत मास कॉपीविद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी परीक्षा सुरू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल ५३ महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रांवर भेटी दिल्या आहेत. त्यातील २१ महाविद्यालयांमध्ये मास कॉपीचा प्रकार उघडकीस आला आहे. त्या शेकडो विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही कुलगुरूंनी एवढ्या केंद्रांवर भेटी देत कारवाई केली आहे.

गुणवत्तेशी तडजोड नाहीमत्स्योदरी शिक्षण संस्था अतिशय उच्च ध्येयाने, ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी सुरू केलेली आहे. संस्थापक अंकुशराव टोपे यांनी संपूर्ण हयातीत कधीही गुणवत्तेशी तडजोड केलेली नाही. त्यानुसार संस्थेचा सचिव व अध्यक्ष म्हणून काम करताना हाच विचार पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे कुलगुरूंच्या भेटीत कॉपीचा गैरप्रकार आढळून आल्यामुळे संस्थेची बदनामी झाली. त्याचे खूप वाईट वाटले. आतापर्यंत संस्थेच्या महाविद्यालयांना कॉपीमुक्त परीक्षा केंद्रांचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे असा प्रकार पुन्हा संस्थेच्या महाविद्यालयांमध्ये घडणार नाही.-राजेश टोपे, संस्थाध्यक्ष, मत्स्योदरी शिक्षण संस्था, जालना

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र