शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापिकेचा राहत्या घरी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:25 IST

मॉडर्न डी. एड. कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापिकेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बुधवारी सकाळी आढळल्याने खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मॉडर्न डी. एड. कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापिकेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बुधवारी सकाळी आढळल्याने खळबळ उडाली. ही घटना जुनाबाजार येथील अमोदी कॉम्प्लेक्समध्ये घडली.लुबना शेख महंमद जुनेद (४४) असे मृत प्राध्यापिकेचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, प्रा. लुबना शेख या अमोदी कॉम्प्लेक्समधील फ्लॅट क्रमांक १३ मध्ये पतीसह राहत होत्या. त्यांचे पती बाँम्बे मर्कंटाईल बँकेत कार्यरत आहेत. ते रविवारपासून घरी गेले नव्हते. रात्रीपासून घरातून दुर्गंधी येत असल्याने याबाबतची माहिती शेजाºयांनी शेख महंमद जुनेद यांना दिली. २३ आॅगस्ट रोजी सकाळी महंमद जुनेद हे घरी गेले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा ठोठावल्यानंतरही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने आणि घरातून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी सिटीचौक पोलिसांना बोलावून घेतले. पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे यांनी शेजाºयांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी घरातील एका खोलीत प्रा.लुभना मृतावस्थेत पडलेल्या दिसल्या. मृतदेह कुजल्याने त्यातून दुर्गंधी येत होती. यावेळी प्रथम पोलिसांच्या वाहनातून मृतदेह घाटीतील शवविच्छेदनगृहात हलविण्यात आला. मृत प्रा. लुबना यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा आजार होता, अशी माहिती त्यांच्या पतीने पोलिसांना दिली.शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण समोर येईल, अशी माहिती सहायक पोलीस उपनिरीक्षक हरीष खटावकर यांनी दिली. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेमागे अन्य काही कारण आहे का, याचाही पोलीस तपास करीत आहेत.