शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जुलूस-ए-मोहम्मदीत उसळला जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 01:21 IST

प्रेषित हजरत मोहम्मद सल्लम यांच्या जन्मदिनानिमित्त शनिवारी सकाळी निझामोद्दीन चौक येथून भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. मागील २४ वर्षांमध्ये या मिरवणुकीत कोणताही खंड पडलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्रेषित हजरत मोहम्मद सल्लम यांच्या जन्मदिनानिमित्त शनिवारी सकाळी निझामोद्दीन चौक येथून भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. मागील २४ वर्षांमध्ये या मिरवणुकीत कोणताही खंड पडलेला नाही. मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, ध्वजारोहण, पुष्पवृष्टीने औरंगाबादकरांचे लक्ष वेधून घेतले. तब्बल पाच तासांहून अधिक वेळ ही मिरवणूक शहरात फिरत होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मिरवणुकीत अभूतपूर्व असा उत्साह पाहण्यास मिळाला.प्रेषितांचा जन्मदिन म्हणजे उर्दू तारखेनुसार १२ रब्बील अव्वल. या दिनाची मागील काही दिवसांपासून चातकाप्रमाणे वाट पाहण्यात येत होती. शहरात ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त पंधरा दिवसांपासून जोरदार तयारीही सुरू होती. शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुतर्फा बाजूने आकर्षक विद्युत रोषणाई, प्रत्येक चौकात मोठमोठे दिवे, झेंडे लावून चांगलीच वातावरण निर्मिती करण्यात आली होती.शनिवारी सकाळी ९ वाजेपासून निझामोद्दीन चौकात हळूहळू गर्दी वाढत होती. पोलीस आयुक्त यशस्वी यादव, ईद-ए-मिलादुन्नबी संयोजन समितीचे निमंत्रक डॉ. शेख मुर्तुझा, माजी महापौर रशीद खान मामू यांच्यासह संयोजन समितीचे सर्व पदाधिकाºयांच्या उपस्थितीत जुलूस-ए-मोहम्मदीला सुरुवात झाली. मिरवणुकीच्या प्रारंभी घोडे, त्यावर लहान-लहान मुले पारंपरिक वेशभूषेत झेंडे घेऊन बसले होते. शहागंज चमन, राजाबाजार, नवाबपुरा, जिन्सी, जिन्सी चौक, कैसर कॉलनी, चंपाचौक, शहाबाजार, मंजूरपुरा, लोटाकारंजा, बुढीलाईन, जुनाबाजार, सिटीचौक, सराफा, गांधी पुतळामार्गे परत हजरत निझामोद्दीन चौक येथे मिरवणूक पोहोचली.मिरवणूक परत आल्यानंतर ध्वजारोहण करण्यात येऊन ‘सलाम’ पढण्यात आले. दर्गा हजरत बनेमियाँ रह. येथे स्वागत समारंभ ठेवण्यात आला होता. जिन्सी चौक, मंजूरपुरा, बुढीलेन, नई बस्ती आदी भागांत मिरवणुकीचे उत्साहात तरुणाईने स्वागत केले. प्रत्येक ठिकाणी ध्वजारोहणही डॉ. मुर्तुझा यांच्या हस्ते करण्यात आले. मिरवणुकीत पवित्र काबाची प्रतिकृतीही उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.मोहंमद असदउल्ला खान तर्रार, मौलाना हिदायत उल्ला खान तर्रार, अ‍ॅड. ख्वाजा जियाउद्दीन खान बियाबाणी, युनूस रझवी, काझी आरेफोद्दीन, हमीद उल्ला खान, सय्यद मजहर शुत्तारी, काझी शकील अहेमद, शेख मुकरम बागवाला, सोहेल मुर्तुझा, कलीम उल्ला खान, सय्यद आसिफ अली आदींची उपस्थिती होती.