औंढा नागनाथ : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंतीनिमित्त शहरातील मुख्य रस्त्यावरून शुक्रवारी दुपारी २ वाजता मिरवणूक काढण्यात आली. अण्णा भाऊ साठे जयंती सोहळा समितीच्या वतीने अण्णा भाऊ साठे चौकामध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता माजी खा. शिवाजी माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच वसंत मुळे, पोनि लक्ष्मण केंद्रे, ग्रामविकास अधिकारी रमेश मोरे, जकी काजी, मनोज देशमुख, बबनराव शिखरे, यशोदा कोरडे, एन.टी. खंडागळे, विनोद खंडागळे, कुंताबाई गोबाडे, अॅड. एस. कदम, राधिका चिंचोलीकर, अरविंद मुळे यांची उपस्थिती होती. दुपारी २ वाजता शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेची गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गुणाजी गायकवाड, दीपक रणखांबे, गणेश रणखांबे, सुनील खंडागळे, लक्ष्मण रणखांबे, पंडित भालेराव, हारणाजी खंडागळे, चंद्रकांत रणखांबे, गंगाधर रणखांबे, लख्मण मंडलिक, विजय रणखांबे, विश्वनाथ सोनवणे, किसन सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. सूत्रसंचालन माधव मुळे यांनी केले. (वार्ताहर)
औंढ्यात जयंतीनिमित्त मिरवणूक
By admin | Updated: August 23, 2014 00:46 IST