शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नव्या कुलगुरूंच्या निवडीची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:15 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ दीड महिनाच राहिला आहे. ४ ...

ठळक मुद्देमुंबईत समितीची बैठक : आगामी आठवड्यात येणार जाहिरात

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ दीड महिनाच राहिला आहे. ४ जून रोजी विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळणे अपेक्षित आहे. नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी नेमलेल्या समितीची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली असून, येत्या आठवड्यात पदासाठी अर्ज मागविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची ३ जून २०१४ रोजी निवड झाली होती. त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या दीड महिन्यानंतर संपणार आहे. नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी कुलपती तथा राज्यपालांनी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून प्रशासनाने दिल्ली आयआयटीतील प्रा. प्रवीण कुमार यांची निवड केली होती. त्यानंतर राज्य शासनाने प्रधान सचिव भूषण गगराणी यांचा समावेश समितीत केला. राज्यपाल कार्यालयाने सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती अनिल दवे यांची निवड केली होती. समितीच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती दवे यांनाच नेमले आहे. या समिती सदस्यांची पहिली बैठक दोन दिवसांपूर्वी मुंबईत पार पडली आहे. पहिल्यांदाच भेटलेल्या समिती सदस्यांनी कुलगुरू निवड समितीचे कामकाज कसे चालणार याविषयी प्राथमिक चर्चा केली. विद्यापीठातर्फे या समितीसाठी लायझनिंग आॅफिसर म्हणून उपकुलसचिव दिलीप भरड यांनाही पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या समितीच्या बैठकीत नोडल अधिकारी नेमणे, अर्ज मागविणे, त्यासाठी जाहिरातीचा मसुदा ठरविणे, कोणत्या माध्यमात जाहिरात प्रसिद्ध करायची? याविषयी सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. समितीचे कामकाज योग्य पद्धतीने सुरू राहण्यासाठी पहिल्यांदा नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात कुलगुरूपद भरण्यासाठी जाहिरात देण्यात येईल, असेही ठरविण्यात आल्याची माहिती आहे. विद्यमान कुलगुरूंचा कालावधी अल्प राहिला असल्यामुळे निवडीची प्रक्रिया दीड महिन्यात पूर्ण करावी लागणार आहे. त्यादृष्टीने समिती प्रयत्न करीत असल्याचेही समजते.--------------

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रuniversityविद्यापीठ